ठाणे : दिवा नजीक असणाऱ्या आगासन गावातील शांत, सरळ व्यक्तिमत्व करसन महीपत मुंडे यांचे गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी वयाच्या 82 व्या वर्षी अल्प आजाराने दुःखद निधन झाले.
गुरुवारी आगासन येथील समशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते.
करसन महीपत मुंडे हे शांत व मनमिळाऊ स्वभावाचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व होते . सर्वांशी आपुलकीने वागणारे अशी त्यांची ख्याती होती.
यांच्या पश्चात पत्नी गुणाबाई करसन मुंडे, मुलगा राजेश , निलेश मुली अनिता संतोष पाटील, वनिता नारायण पाटील, ललिता राकेश पाटील पुतणे , नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा निधनाने मुंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांचा दशक्रिया (दहावा ) शनिवार दिनांक 6 जून २०२६ रोजी आगासन खाड़ी गणेश घाट येथे तर तेरावा विधी (उत्तरकार्य ) मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी मु. आगासन पोस्ट दिवा तालुका /जिल्हा ठाणे येथील राहत्या घरी होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.

