Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात 'पीसीओडी क्लिनिक'चा शुभारंभ.. महिलांच्या आरोग्य सुदृढतेसाठी पुढाकार

ठाणे,दि.6 : राज्यातील महिलांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी आणि विशेषतः शहरी भागातील अविवाहित तरुणी व प्रजनन कालावधीतील महिलांमध्ये वाढणाऱ्या 'पीसीओडी' (PCOD) या हार्मोनल समस्येवर वेळीच उपचार उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत आज राज्यभर पीसीओडी क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. याच अभियानाचा भाग म्हणून आज दि. ६ मे २०२६ रोजी, जिल्हा रुग्णालय ठाणे येथे माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली 'पीसीओडी क्लिनिक' चे उत्साहात उद्घाटन करण्यात आले.

या उद्घाटन प्रसंगी माननीय अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक (ACS) आणि माननीय निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क (RMO-OR) यांनी pcod संदर्भात महत्वाचे मार्गदर्शन केले. त्यांच्यासह रुग्णालयातील तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञ (Gynaecologist) आणि अधिसेविका मॅडम यांनी उपस्थित महिला व रुग्णांना पीसीओडी संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.

क्लिनिकचे स्वरूप आणि उपलब्ध सेवा : हे पीसीओडी क्लिनिक आता जिल्हा रुग्णालयात दर बुधवारी 'मेनोपॉज ओपीडी' (Menopause OPD) सोबत नियमितपणे सुरू राहणार आहे. या क्लिनिकमध्ये महिलांना खालील सेवा पुरवल्या जाणार आहेत.

तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञांकडून आरोग्य तपासणी. हार्मोनल बदलांवर आधारित आवश्यक वैद्यकीय चाचण्या. एकात्मिक पद्धतीचा (Integrated Approach) औषधोपचार. आरोग्यविषयक आणि मानसिक समुपदेशन. तज्ज्ञांमार्फत आहार व जीवनशैलीविषयक विशेष मार्गदर्शन.

कार्यक्रमादरम्यान तज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "बदलती जीवनशैली आणि मानसिक ताणतणावामुळे तरुणींमध्ये पीसीओडीचे प्रमाण वाढत आहे. योग्य वेळी निदान आणि उपचार झाल्यास या समस्येवर मात करणे शक्य आहे." उद्घाटनानंतर क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्णांची प्रत्यक्ष तपासणी करून त्यांना आवश्यक औषधोपचार व समुपदेशनही करण्यात आले.

जिल्हा रुग्णालय ठाणे येथील या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |