पंकज फायटर या संघावर मात; कोपरखैरणेत क्रिकेटचा जल्लोष
नवी मुंबई: क्रिकेटच्या माध्यमातून टिम ( संघाच्या ) एकात्मतेची सांगड घालणाऱ्या " स्पाॅट बाॅईज प्रिमियर लिग" या क्रिकेट स्पर्धेचा कोपरखैरणे येथे समारोप झाला.अंतिम सामन्यात जोयल स्ट्राईकर या संघाने या संघाने पंकज फायटर या संघावर मात करीत विजेतेपद पटकाविले.
कोपरखैरणे येथील सेक्टर - २३ येथील भुमि पुत्र मैदानावर एकदिवसीय रंगलेल्या या स्पर्धेत ४ संघांनी सहभाग नोंदविला होता.स्पर्धेत रेया चॅलेंजर जोयल स्ट्राईकर पंकज फायटर आणी द्राव्या इंडियन्स या संघांनी सहभाग घेतला होता.स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज - कल्पेश जैस्वाल, उत्कृष्ट गोलंदाज - स्वप्नील देशमुख (पायलट), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक - रंजित पाटील तसेच संपूर्ण स्पर्धेत मालिकावीर म्हणून जिवण गोपाळे यांना स्पोर्ट्स सायकल तसेच आकर्षक चषक देण्यात आले.
स्पर्धेत रेया चॅलेंजर, जोयल स्ट्राईकर, पंकज फायटर आणी द्राव्या इंडियन्स असे चार संघ सहभागी झाले होते.अंतिम सामना रंगतदार अवस्थेत ठरला.पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी नवनिर्वाचित नगरसेविक श्री.शिरिष प्रभाकर पाटील, युवानेते ( समाजसेवक) श्री.ऋषिकेश शिवराम पाटील,४०+ खेळाडू श्री.केसरीनाथ पांडुरंग म्हात्रे ( KP), श्री.जितेंद्र विष्णू म्हात्रे, श्री.उमेश ज्ञानदेव पाटील यांच्या समवेत समालोचक - उमेश दत्तु म्हात्रे आणी रवि शंकर पाटील यांच्या खास उपस्थितीत पार पडला.यावेळी आयोजक स्पाॅट बाॅईज मित्र मंडळाचे सदस्य गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.स्पर्धेबाबतची माहिती क्रिडाप्रेमी अविनाश भरत पाटील यांनी दिली.

