Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

ठाणे जिल्ह्यातील विकासकामे, भूसंपादन आणि विशेष मोहिमांचा विभागीय आयुक्तांकडून सखोल आढावा

ठाणे,दि.12 :- शासन व प्रशासन सर्वसामान्यांच्या सर्वांनी विकासासाठी कटिबद्ध आहे. त्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यातही शहरी व ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत. या विकासकामांचा तसेच महसूल विभागाच्या नियमित कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयास भेट दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात ही बैठक संपन्न झाली.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या आढाव्याबरोबरच विभागीय आयुक्त श्रीमती अग्रवाल यांनी विशेष शासकीय प्रकल्पासाठी लागणारी जमीन आणि भूसंपादन स्थिती, शासकीय जमीन, ग्राम भेटी या विषयांचाही सविस्तर आढावा घेतला. त्याबरोबरच विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR), जनगणना व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कामकाजाबाबतचाही आढावा त्यांनी घेतला. या कामांमध्ये येत असलेल्या अडचणी त्यांनी यावेळी जाणून घेतल्या तसेच या विशेष मोहिमा विहित वेळेत पूर्ण करण्याविषयी संबंधितांना सूचना दिल्या.

या बैठकीत विभागीय आयुक्त श्रीमती अग्रवाल यांनी शहापूर तालुक्यातील चोंढे खुर्द या गावात झालेल्या घोंगडी बैठकीचा आवर्जून उल्लेख केला आणि या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. लोकाभिमुख प्रशासनासाठी अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी राबविणे, ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्यासह अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, विभागीय आयुक्त कार्यालयाचे सह आयुक्त विजयकुमार म्हसाळ, विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त डॉ. सागर घोलप, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, ठाणे नगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह उपजिल्हाधिकारी रूपाली भालके, सर्जेराव मस्के-पाटील, वरुणकुमार सहारे, शशिकांत गायकवाड, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, अमित सानप, विजयानंद शर्मा, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले, तहसिलदार रेवण लेंभे, सचिन चौधर, प्रदीप कुडाळ, उमेश पाटील, निलेश गौड, अमित पुरी, अभिजीत देशमुख, अभिजित खोले, विकास गारुडकर, परमेश्वर कासुळे, मीनल दळवी, जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी, महानगरपालिकांचे उपायुक्त यांची उपस्थिती होती.

बैठकीनंतर श्रीमती अग्रवाल यांनी कोपरी ठाणे येथील मध्यवर्ती निवडणूक कार्यालय येथे भेट देऊन तेथील व्यवस्थेची तपासणी केली. याशिवाय त्यांनी नागरी सेवा केंद्रास भेट देवून तेथील कामकाजाची, नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची माहिती घेतली. त्यानंतर श्रीमती अग्रवाल यांनी ठाणे तालुका क्रीडा संकुलासही भेट दिली. येथे त्यांनी खेळाडूंना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची सविस्तर माहिती घेतली. यावेळी प्रांताधिकारी उर्मिला पाटील, तहसिलदार उमेश पाटील, नायब तहसिलदार दत्तात्रय बेर्डे, नागरी सेवा केंद्राचे केंद्रचालक, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, क्रीडा कार्यालयाचे इतर अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

एकूणच विभागीय आयुक्त श्रीमती अग्रवाल यांनी ठाणे जिल्ह्यातील प्रगतीपथावर असलेल्या कामकाजाची माहिती घेवून कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |