कल्याण | २० जून :नरेंद्र पवार फाउंडेशन आणि तहसीलदार कार्यालय, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत शासकीय दाखले वितरण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध शासकीय कामांसाठी दाखल्यांची आवश्यकता असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत या उपक्रमाचा लाभ घेतला.
शालेय- महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया तसेच विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक असलेले स्थानिक वास्तव्य दाखला, डोमिसाईल (अधिवास) दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि ज्येष्ठ नागरिक कार्ड मिळविण्यासाठी शेकडो नागरिकांनी शिबिरात गर्दी केली होती. एकाच ठिकाणी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून दाखले मिळण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
विशेषतः विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेचा कालावधी सुरू असल्याने अनेक विद्यार्थी आणि पालकांनी या शिबिराचा लाभ घेतला. तहसीलदार कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करत दाखले वितरणाची प्रक्रिया सुलभ आणि जलद पद्धतीने पूर्ण केली.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी माजी आमदार तथा कल्याण विकास फाउंडेशन अध्यक्ष नरेंद्र पवार, नगरसेविका अध्यक्षा हेमलता नरेंद्र पवार तसेच नगरसेवक आणि केडीएमसी शिक्षण समिती सदस्य शामल मंगेश गायकर यांनी विशेष पुढाकार घेतला होता. नागरिकांच्या सोयीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत असून भविष्यातही अशा प्रकारची शिबिरे आयोजित करण्याची विनंती नागरिकांनी केली.
या उपक्रमामुळे अनेक नागरिकांची शासकीय कार्यालयांमधील धावपळ वाचली असून शेकडो नागरिकांना आवश्यक शासकीय दाखले एका दिवसात उपलब्ध करून देण्यात यश आले अशी माहिती नगरसेविका हेमलता नरेंद्र पवार यांनी दिली.
यावेळी शिवसेनाच्या स्थानिक नगरसेविका विजया अरविंद पोटे, नितिन चौधरी, गणेश गायकर, प्रणव महाजन, चंदू बिरारी, संदीप गडगे, रोहित लामतुरे, बंटी अपराज, चंदू बिरारी, अमोल गायकवाड, भिका भदाणे, प्रभाकर शिंदे, नाना बारवे, संतोष राजपूत, अरुण राजपूत, गौरव पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

