अंबरनाथ / नवाज वणू : अंबरनाथचे युवा उद्योजक तथा नगरसेवक विश्वजित गुलाबराव करंजुले-पाटील यांचा शनिवारी २० जून रोजी वाढदिवस सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. शहरातील विविध नगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.आजच्या काळात वाढदिवस म्हटलं की, बॅनरबाजी, फटाके, खाण्यापिण्यात हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर वायफळ खर्च केल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र युवा उद्योजक, भाजपा शहराध्यक्ष, नगरसेवक विश्वजित गुलाबराव करंजुले-पाटील यांनी आपला वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून साजरा करत एक वेगळा आदर्श निर्माण केल्याचे समाधान यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
अंबरनाथ पश्चिम खुंटवली येथील बहुभाषिक नगरपरिषद शाळा, वूलन चाळ येथील श्रद्धा हिंदी शाळा, कानसई नगरपालिकेची शाळा क्रमांक ८ तसेच शिवाजीनगर, वडवली येथील श्रीराम हिंदी विद्यालय येथील विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल आणि छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
तसेच वडोल गावातील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक १२ मध्ये भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक विश्वजीत करंजुले-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक मनीष म्हात्रे आणि नगरसेविका धनलक्ष्मी जयशंकर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शैक्षणिक कार्यक्रमादरम्यान विविध ठिकाणी विश्वजित करंजुले पाटील यांचे नागरिकांनी स्वागत करत वाढदिवसाचा केक कापून शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुकही करण्यात आले."वाढदिवस साजरा करण्यापेक्षा समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काहीतरी उपयुक्त काम व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला," अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.या कार्यक्रमाला भाजपा नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील, भाजपा गटनेते व नगरसेवक अभिजित करंजुले-पाटील, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून विश्वजित करंजुले पाटील यांनी समाजापुढे एक सकारात्मक संदेश दिला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
कोहजगाव ग्रामस्थ मंडळाच्यावतीने छत्रांचे वाटप-पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या उपयोगी पडेल असा सामाजिक उपक्रम अंबरनाथमध्ये राबविण्यात आला. भाजप नगरसेवक तथा युवा उद्योजक विश्वजित गुलाबराव करंजुले-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोहोजगाव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने विद्यार्थी आणि नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. समाजसेवक सुरेंद्र पाटील, मिलिंद पाटील आणि कोहोजगाव ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
पावसाळ्याच्या दिवसांत तसेच उन्हाच्या तडाख्यापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कोहोजगाव परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच शालेय विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.यावेळी उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत विश्वजित करंजुले पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.या कार्यक्रमाला नगराध्यक्षा तेजश्री करंजुले-पाटील, समाजसेवक सुरेंद्र पाटील, मिलिंद पाटील, माजी नगरसेवक पांडुरंग खराडे, किरण राठोड, स्वीकृत नगरसेवक उमेश पाटील, माजी नगरसेवक पंकज पाटील, सावकार ग्रुप, कोहोजगाव ग्रामस्थ मंडळाचे सदस्य आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

