नवी मुंबई: कोपरखैरणे गावातील सेक्टर -१९ मधील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक ३६-१२२ येथे दिनांक जुन सोमवारी नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभ निमित्त शाळा प्रवेशोत्सव व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ उत्साह पुर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमास नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त श्रीमती.अलका महापूरकर मॅडम उप अभियंता श्री.मारूती आंबेडकर साहेब, नवी मुंबई महानगरपालिका माजी स्थायी समिती सभापती तसेच कोपरखैरणे गाव प्रभाग क्रमांक ११ चे सन्माननीय नगरसेवक श्री.शिवराम परशुराम पाटील साहेब, तसेच नगरसेविका सौ.अनिता शिवराम पाटील मॅडम यांच्या समवेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनिषा शेलार मॅडम आदी मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्वं विद्यार्थ्यांचे सर्व पालकांचे लेझीम च्या तालावर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
सहाय्यक आयुक्त सन्माननीय अलका महापूरकर मॅडम यांनी स्वतः लेझीम तालावर विद्यार्थ्यांसोबत लेझीम पथकासोबत लेझीम करत सर्वं विद्यार्थी शिक्षक सर्वांच उत्साहाने स्वागत केले.या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित सर्वं विद्यार्थ्यांना व पालकांना सहाय्यक आयुक्त श्रीमती.अलका महापूरकर मॅडम व उप अभियंता मारुती आंबेडकर साहेब तसेच सन्माननीय नगरसेवक श्री.शिवराम परशुराम पाटील साहेब आणी नगरसेविका सौ.अनिता शिवराम पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांची जडणघडण गुणवत्ता पुर्ण शिक्षणाची आवश्यकता यावर सखोल विचार मांडले आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
आनंददायी शाळा शाळेचे वातावरण शैक्षणिक गुणवत्ता व विविध उपक्रमांची पाहणी करून पाटील साहेबांनी खुप शाळेचे व विद्यार्थाचे कौतुक केले व शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या कार्याचे कौतुक केले.ह्या कार्यक्रमाच्या शेवटी बीज संकलन हा उपक्रम शाळेने राबविण्यात आला होता त्यामध्ये विविध बियाणे विद्यार्थानी संकलन केले होते उदाहरणार्थ जांभळाच्या बिया आंब्याच्या कोई ,धामणे आणखीन परिसरातील जे उपलब्ध बियाणे होते त्यांची ओळख व्हावी म्हणून त्यांची मांडणी करून जांभळाच्या बिया व त्या समोर जांभळाचे झाड कसे असते हे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना व मान्यवरांना विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.अश्या ह्या प्रकारे हा कार्यक्रम संवर्धन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा व उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
अश्या या कार्यक्रमासाठी इशस्तवन व स्वागत गीत सादर करण्यासाठी आपल्या शाळेतील स़गीत विशारद श्री.दत्तात्रय गागरे सर यांनी उत्तमरीत्या पार पाडले . तसेच कार्यक्रम आम्हा साठी सर्वं मान्यवर पालक विद्यार्थी शिक्षक यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या व उत्सव पुर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात शाळा प्रवेशोत्सव व नवागताचे स्वागत विद्यार्थ्यांना गोड पदार्थ खाऊ, फुले,पेन पेन्सिल देऊन यशस्वीरीत्या संपन्न करण्यात आला.इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन तसेच शाळेतील पहिले पाऊल या प्रमाणे विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे व ते कायमस्वरूपी विद्यार्थांच्या कडे जतन करून ठेवण्यात येतील ह्या आशेने वर्ग शिक्षकांनी तेथे सहकार्य केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.दिपाली दयानंद संखे मॅडम आणी माध्यमिक मुख्याध्यापिका श्रीमती.डाॅली चव्हाटकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या.ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संगीत विशारद श्री.दत्तात्रय गागरे सर यांनी इशस्तवन व स्वागत गीत सादर करून विद्यार्थ्यांचे व मान्यवरांचे शब्द समनाने स्वागत केले.श्री .प्रशांत नामदेव गाडेकर सर यांनी प्रास्ताविक करून शाळेतील विविध उपक्रम शाळेची गुणवत्ता व खेळाचे महत्त्व सर्व मान्यवरांना तिथे विषद करण्यात आले, तसेच श्रीमती अनिता गायकवाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना नववर्षाच्या शुभेच्छा तसेच शाळेचा तिसरा आधारस्तंभ म्हणजे आमचे स्वच्छता दुत सर्व कर्मचारी बहुउद्देशीय कर्मचारी तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
तसेच ह्या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.कुणाल कोष्टवार सर यांनी केले.अशी माहिती ग्रामस्थ अविनाश भरत पाटील ( शाळेचे माजी विद्यार्थी ) यांनी दिली

