Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

"आधी स्वतः स्मार्ट व्हा, मग स्मार्ट मीटर लावा"..महावितरण अधिकाऱ्यांची शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी घेतली खरडपट्टी..

डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण ग्रामीण भागात एकीकडे स्मार्ट मीटर लावण्यावर महावितरण कंपनीचा भर असताना दुसरीकडे मात्र वीज पुरवठा खंडीत होणे हे प्रकार वारंवार होत आहे. यामुळे नागरिक पुरते वैतागले असून यावर शिवसेनेने महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. मंगळवार ७ तारखेला शिवसेना कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघ आमदार राजेश मोरे ह्यांनी महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.

यावेळी आमदार राजेश मोरे म्हणाले, 'तुमचे स्मार्ट मीटर ओवर स्मार्ट आहेत ''विजेचा लपंडाव त्वरित बंद करा ',कमी-उच्च दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्यावर नियंत्रण आणून वीज पुरवठा सुस्थितीत नियंत्रित करा, शिवसेनेचा स्मार्ट मीटरला विरोध आहे,नवे स्मार्ट मीटर हे अतिस्मार्ट मीटर असून ग्राहकांवर जबरदस्ती करू नये असेही यावेळी आमदार मोरे म्हणाले.

आमदार मोरे पुढे म्हणाले,तांत्रिक आकडेवारीनुसार डोंबिवली हे १००% वीज भरणा करणारे व शून्य टक्के वीज चोरी असणारे शहर असून ह्या सुशिक्षित शहरात वीज गळतीचे प्रमाण हे सुधा अत्यल्प प्रमाणात असल्यामुळे आम्हाला अतिस्मार्ट मीटरची गरज नाही.

वीज घालवण्याआधी तसे मेसेज ग्राहकांना पाठवा, निदान वीज गेल्यावर वीज ग्राहकांचे फोन उचलून त्यांना स्पष्टीकरण द्या,आधी स्वतः स्मार्ट व्हा नंतर स्मार्ट मीटरचे बघू अश्या आवेशात टाटा पॉवर, एमआयडीसी येथील महाराष्ट्र वीज वितरण मंडळाच्या कार्यालयात मुख्य कार्यकारी अभियंते जगदीश बोडके आणि त्या त्या विभागातील सर्व महावितरणचे विभाग अभियंते ह्यांची आमदार राजेश मोरे ह्यांच्या सह उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, विवेक खामकर, राजन मराठे, ओम् लोके, नगरसेवक सूरज मराठे हे शिवसेना पदाधिकारी आणि काही नागरिक ह्यांनी खरडपट्टी काढली.

गेले अनेक दिवस डोंबिवली व कल्याण ग्रामीण परिसरात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे, तासंतास वीज पुरवठा कुठलीही पूर्व सूचना न देता गायब होतो, फोन केला तर तो उचलला जात नाही, १५/२० तास वीज जाते ती येत नाही, अनेक दिवस वीज पुरवठ्यात दाब कमी जास्त होत असल्यामुळे अनेक महागडी विद्युत उपकरणे बिघडल्याच्या तक्रारी वाढत आहेत ह्या नागरिकांच्या नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल करत शिवसेनेच्या शिष्ट मंडळाने वीजवितरण अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले, आमदार राजेश मोरे ह्यांनी खंबाळपाडा,एमआयडीसी, कल्याण ग्रामीण क्षेत्रातील अनेक गावात हा विजेचा खेळ सुरू आहे असा अनेक उदाहरणासह मुद्दा उपस्थित केला, तसेच स्मार्ट मीटरला आमचा पूर्ण विरोध असून ग्राहकांच्या संमती शिवाय ते लावण्यात येऊ नये अश्या सूचना दिल्या…

स्मार्ट मीटर हे विजेची गळती व वीज चोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बसविले जात आहेत, डोंबिवली परिसर हा सुशिक्षित आणि शासनाचा सर्व कर प्रामाणिक पणे भरणारे शहर आहे, येथे वीज चोरी शून्य आणि वीज देयक भरणा १००% आहे तसेच गळती सुधा अत्यल्प आहे मग डोंबिवलीकरांना स्मार्ट मीटरची सक्ती कशाला..? जर स्मार्ट मीटरची सक्ती करायचीच असेल तर विजेचा दर आणि वीज वापर टप्यानुसार वाढणार वाढीव वीज दर आधी कमी करा, वीज बिल अवाच्या सवा येतात ती हे वीज दर कमी करून नियंत्रणात आणा आणि मग स्मार्ट मीटर लावा, कुठल्या विशिष्ट कंपन्यांच्या फायद्यासाठी सामान्य जनतेचे कंबरडे मोडू नका असे सूचित करून तसा वरिष्ठ पातळीवर सुधा आमदार पाठपुरावा करणार आहेत…

जर वीज पुरवठ्यातील त्रुटी, अनियमितता ह्यावर जर लवकरात लवकर नियंत्रण मिळविले नाही तर तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल असे आमदार राजेश मोरे ह्यांनी सांगून निवेदन दिले.

तांत्रिक आकडेवारी नुसार डोंबिवली हे १००% वीज भरणा करणारे व शून्य टक्के वीज चोरी असणारे शहर असून ह्या सुशिक्षित शहरात वीज गळतीचे प्रमाण हे सुधा अत्यल्प प्रमाणात असल्यामुळे आम्हाला अतिस्मार्ट मीटरची गरज नाही…

वीज घालवण्या आधी तसे मेसेज ग्राहकांना पाठवा, निदान वीज गेल्यावर वीज ग्राहकांचे फोन उचलून त्यांना स्पष्टीकरण द्या,आधी स्वतः स्मार्ट व्हा नंतर स्मार्ट मीटरचे बघू अश्या आवेशात आज टाटा पॉवर, एमआयडीसी येथील महाराष्ट्र वीज वितरण मंडळाच्या कार्यालयात मुख्य कार्यकारी अभियंते श्री जगदीश बोडके आणि त्या त्या विभागातील सर्व महावितरण चे विभाग अभियंते ह्यांची आमदार राजेश मोरे ह्यांच्या सह उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, विवेक खामकर, राजन मराठे, ओम् लोके, नगरसेवक सूरज मराठे हे शिवसेना पदाधिकारी आणि काही नागरिक ह्यांनी खरडपट्टी काढली, गेले अनेक दिवस डोंबिवली व कल्याण ग्रामीण परिसरात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे, तासंतास वीज पुरवठा कुठलीही पूर्व सूचना न देता गायब होतो, फोन केला तर तो उचलला जात नाही, १५/२० तास वीज जाते ती येत नाही, अनेक दिवस वीज पुरवठ्यात दाब कमी जास्त होत असल्यामुळे अनेक महागडी विद्युत उपकरणे बिघडल्याच्या तक्रारी वाढत आहेत ह्या नागरिकांच्या नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल करत शिवसेनेच्या शिष्ट मंडळाने वीजवितरण अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले, आमदार राजेश मोरे ह्यांनी खंबाळपाडा,एमआयडीसी, कल्याण ग्रामीण क्षेत्रातील अनेक गावात हा विजेचा खेळ सुरू आहे असा अनेक उदाहरणासह मुद्दा उपस्थित केला, तसेच स्मार्ट मीटरला आमचा पूर्ण विरोध असून ग्राहकांच्या संमती शिवाय ते लावण्यात येऊ नये अश्या सूचना दिल्या…

स्मार्ट मीटर हे विजेची गळती व वीज चोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बसविले जात आहेत, डोंबिवली परिसर हा सुशिक्षित आणि शासनाचा सर्व कर प्रामाणिक पणे भरणारे शहर आहे, येथे वीज चोरी शून्य आणि वीज देयक भरणा १००% आहे तसेच गळती सुधा अत्यल्प आहे मग डोंबिवलीकरांना स्मार्ट मीटरची सक्ती कशाला..? जर स्मार्ट मीटरची सक्ती करायचीच असेल तर विजेचा दर आणि वीज वापर टप्यानुसार वाढणार वाढीव वीज दर आधी कमी करा, वीज बिल अवाच्या सवा येतात ती हे वीज दर कमी करून नियंत्रणात आणा आणि मग स्मार्ट मीटर लावा, कुठल्या विशिष्ट कंपन्यांच्या फायद्यासाठी सामान्य जनतेचे कंबरडे मोडू नका असे सूचित करून तसा वरिष्ठ पातळीवर सुधा आमदार पाठपुरावा करणार आहेत…

जर वीज पुरवठ्यातील त्रुटी, अनियमितता ह्यावर जर लवकरात लवकर नियंत्रण मिळविले नाही तर तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |