Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

वाढदिवसानिमित्त सातारा तालुक्यातील ईहसास मतीमंद शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान !

 
मुंबई: नेहरूनगर, कुर्ला पश्चिम येथील श्री. महेंद्र प्रभाकर गडकरी यांनी आपल्या दि.10 ऑगस्ट रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून सातारा तालुक्यातील ईहसास मतीमंद संस्थेतील विद्यार्थ्यांना अन्नदान केले. 

वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळुन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवला गेला होता.याप्रसंगी शाळेतील ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पोळी ,भाजी ,वरण,भात आणी गोड शिरा अशा पौष्टिक भोजनाचे वाटप करण्यात आले.गरमागरम आणि स्वादिष्ट भोजन मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.या कार्यक्रमाला संस्थेचे व्यवस्थापक उपस्थित होते. संस्थेचे मुख्य अधिकारी यांनी गडकरी यांच्या या कौतुकास्पद उपक्रमाचे आभार मानले आणि समाजातील इतर नागरिकांनी असा आदर्श घ्यावा,असे आवाहन केले. 

महेंद्र गडकरी यांनी यावर्षी आपल्या वाढदिवसाला असाच सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला होता.या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या या उपक्रमात त्यांची पत्नी व मुले उपस्थित होते.अशी माहीती ग्रामस्थ अविनाश भरत पाटील यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |