Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

नागपंचमी निमित्त श्री चिकणेश्वर शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी !

नवी मुंबई : नागपंचमी चा दिवस हा योगायोगाने पहिला श्रावण सोमवार आल्याने दिवसभर साजरा केला गेला.सपुर्ण महाराष्ट्रात या दिवशाचे विशेष महत्त्व आहे.याच निमित्ताने कोपरखैरणे सेक्टर - ३ मधील श्री चिकणेश्वर शिवमंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती पाहायला मिळाली.मंदिरात सकाळ पासूनच भक्तांनी रांगाच रांगा लावल्या होत्या.

नागदेवतेला दुध ,फळं, अर्पण करून भाविक भक्तांनी आपल्या घराचं सुख- शांती आणि आरोग्य यासाठी प्रार्थना केली गेली.मंदिर परिसरात विविध धार्मिक विधी, मंत्रपठण, अभिषेक आणि भजनांचा कार्यक्रम पार पडला गेला.स्थानिक पुजाऱ्यांनी भाविक भक्तांन च्या उपस्थित पारंपारिक पद्धतीने पुजा करण्यात आली.

श्री चिकणेश्वर मंदिर ट्रस्ट च्या माध्यमातून संस्थापक /अध्यक्ष श्री.निलेश अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य अश्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या.येथील स्वयंसेवक यांच्या माध्यमातून सुरक्षित अश्या दर्शनासाठी भाविकांनी रांगेतून दर्शन घेण्यासाठी भाविकांना प्रवृत्त करत होते.

महिलांनी पारंपरिक पद्धतीने पोशाखा मध्ये उत्साहात भाग घेतला होता.नागपंचमी हा सण शेतकऱ्यांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो कारण नाग देवतेला पर्जन्याचे प्रतीक मानले जाते.त्यामुळे अनेकांनी शिव मंदिरात पुजा केली गेली.नागपंचमी चा दिवस भक्तीभाव आणी श्रद्धेने अशा भरलेला गेला,अशे अनेक भाविक भक्तांनी सांगितले.

श्री पुरातन चिकणेश्वर शिवमंदिरात दर सोमवारी मंदिरातील मूर्ती ला पर्यावरणपूरक अश्या शाडु माती च्या माध्यमातून नानाविध अश्या देव- देवं त्यांच्या रूपानं भाविक भक्तांन करता दर्शनासाठी मुर्ती ला साजशृंगार केला जातो.या श्रावण महिन्यात प्रथमच चारीही सोमवार निमित्त मंदिरात भाविकांन करता दर्शनासाठी श्री चिकणेश्वर मंदिर ट्रस्ट च्या माध्यमातून संस्थापक / अध्यक्ष श्री.निलेश अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली साकारण्यात येणाऱ्या या श्रावण महिन्यातील चारही सोमवारी भगवान शिवशंकराच्या चार धाम या शिवलिंग स्वरूपाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि पुण्यसंचय करून या चार ही सोमवारी अवश्य दर्शन घ्या आणि आशीर्वाद घ्या.अशे आवाहन येथील शिवभक्त अविनाश भरत पाटील यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |