Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

कलमठ ग्रामपंचायतीचा सातारा जिल्ह्यात अभ्यास दौरा

माण्याचीवाडी व बनवडी ग्रामपंचायतींच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची घेतली माहिती

कणकवली : ग्रामपंचायत कलमठ, ता. कणकवली आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या माध्यमातून ७ व ८ ऑगस्ट रोजी जिल्ह्याबाहेरील ग्रामपंचायत अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून कलमठ ग्रामपंचायतीला आदर्श ग्राम बनविण्याच्या उद्देशाने हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.

या दौऱ्यात ग्रामपंचायत कलमठचे सरपंच श्री. संदिप मेस्त्री, जि. प. सदस्या श्रीम. सुप्रिया मेस्त्री, पं. स. सदस्य श्री. गुरुनाथ वर्देकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. स्वप्नील चिंदरकर, श्री. दिनेश गोठणकर, श्री. नितीन पवार, श्री. रविंद्र यादव, श्री. श्रेयस चिंदरकर, श्री. सचिन खोचरे तसेच ग्रामपंचायत सदस्या श्रीम. प्रियाली आचरेकर, श्रीम. स्वाती नारकर, श्रीम. हेलन कांबळे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. दत्तात्रय तळवडेकर, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. महेश लाड, ग्रामपंचायत कर्मचारी जयेश मेस्त्री व कार्यक्रम समन्वयक श्री. शशिकांत कासले यांच्यासह एकूण १८ जण सहभागी झाले.

अभ्यास दौऱ्यात सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माण्याचीवाडी ग्रामपंचायतीस भेट देण्यात आली. सरपंच श्री. माणे यांनी ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रत्यक्ष गावफेरी करून पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा, सांडपाणी व्यवस्थापन, शाळा व्यवस्थापन तसेच जनावरांसाठी उभारण्यात आलेल्या स्नानगृहाची पाहणी करण्यात आली.

त्यानंतर कराड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीस भेट देऊन जलशुद्धीकरण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन व गांडूळखत निर्मिती प्रकल्पांची माहिती घेण्यात आली.

कलमठ ग्रामपंचायतीच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून इतर गावांसाठी आदर्श निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा अभ्यास दौरा अत्यंत उपयुक्त ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |