शिवानंद प्रतिष्ठानचा उपक्रम; गोविंदा पथकांना सरावासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत पारंपरिक खेळाला प्रोत्साहन
दिवा : शिवानंद प्रतिष्ठानच्या वतीने दिवा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी सराव शिबिराला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भेट देत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. शिवसेना दिवा शहर प्रमुख तथा नगरसेवक रमाकांत मढवी आणि नगरसेविका साक्षी मढवी यांच्या माध्यमातून या सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दहीहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि उत्साहपूर्ण परंपरेशी जोडलेला सण आहे. या पारंपरिक खेळाला प्रोत्साहन देत गोविंदा पथकांना दहीहंडी उत्सवापूर्वी सरावासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा शिवानंद प्रतिष्ठानचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले.
सराव शिबिराला भेट देताना त्यांनी गोविंदा पथकांशी संवाद साधत त्यांच्या तयारीची माहिती घेतली. तसेच आगामी दहीहंडी उत्सवासाठी सर्व गोविंदा पथकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
“दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा करताना गोविंदांनी सुरक्षिततेची पूर्ण काळजी घ्यावी. परंपरा, उत्साह आणि जल्लोष कायम ठेवत सुरक्षितपणे दहीहंडी साजरी करावी,” असे आवाहनही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.
शिवानंद प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. तसेच भविष्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, युवासेना जिल्हाध्यक्ष जितेन पाटील, नगरसेवक आदेश भगत यांच्यासह सर्व स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

