Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

राष्ट्रीय कर्मचारी सेनामुळे कोटक महिंद्रा बँकेतील कर्मचाऱ्यांचा केंद्र सरकारच्या नियमानुसार पगार वाढ


शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आ. श्री.किरण पावसकर यांचे नेतृत्व

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर ) : शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आ.श्री.किरण पावसकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोटक महिंद्रा बँकेतील कर्मचाऱ्यांचा केंद्र सरकारच्या नियमानुसार पगार वाढ झाली ती वाढ जुलै महिन्याच्या पगारामध्ये देण्यात आली. ही पगारवाढ मिळण्यासाठी चिटणीस श्री.तातू नाईक यांनी अथक परिश्रम घेतले.

या पगारवाढीचा जल्लोष साजरा करण्यासाठी कोटक महिंद्रा बँकेतील सर्व पदाधिकारी यांनी ०८ ऑगस्ट २०२६ रोजी बाळासाहेब भवन येथे फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.चिटणीस श्री.तातू नाईक यांनी बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बांधणी अनेक वर्ष केली त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत राहिले आज त्या लढ्याचे सार्थक झाले.

झालेली पगारवाढ तब्बल १२ वर्षानंतर कर्मचाऱ्यांच्या हाती आली. ही पगारवाढ फक्त आणि फक्त राष्ट्रीय कर्मचारी सेनेमुळे आम्हाला मिळाली. (तसेच मागील युनियन उ.बा.ठा. भारतीय कामगार सेना यांनी कामगारांचे १२ वर्ष उध्वस्त केली.) या पलीकडे राष्ट्रीय कर्मचारी सेनेने आम्हाला ०३ वर्षांमध्येच आमचा हक्काचा पगारवाढ मिळवून दिल्याबद्दल आजचा दिवस आम्ही दसरा आणि दिवाळी म्हणून कुटुंबासोबत साजरा करत आहोत, श्री.अशोक सूर्यवंशी आणि श्री. रवींद्र जाधव हे गेले १५ वर्ष कोटक बँकेमध्ये काम करत आहेत त्यांचा अनुभवही त्यांनी आपल्या भाषणात सांगितला.

तसेच पावसकर साहेबांनी आपल्या भाषणात सांगितले ही पगारवाढ तर मिळवून दिलीच नोव्हेंबर २०२५ पासूनचा थकीत भत्ता तुम्हाला लवकरच दिला जाईल. त्यासोबत दरवर्षी तुम्हाला डी.ए. वाढवून मिळेल आणि कुटुंबाचा आरोग्य विमा ही देण्यात येणार आहे, आणि कोटक महिंद्रा बँकेतील कर्मचाऱ्यांचा जसा केंद्र सरकारच्या नियमानुसार पगार वाढ झालेला आहे असाच सर्वच बँकेतील कर्मचाऱ्यांना हा नियम लागू करणार आणि सर्वच बँकेतील कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार. आणि ॲक्सिस बँके वरती उच्च न्यायालयात (High court) मध्ये जी केस दाखल केली गेली आहे. ती देखील केस लवकरच जिंकून तिथल्या हजारो कर्मचाऱ्यांना अशीच पगार वाढ एरियस मिळवून देणार. तसेच राष्ट्रीय कर्मचारी सेना ही फक्त कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी स्थिरता आणि सुरक्षितता प्रधान करण्याचे ध्येय घेऊन काम करणार असे सांगितले. पावसकर साहेबांनी पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे सर्व कर्मचाऱ्यांकडून आभार मानले.

याप्रसंगी सोबत राष्ट्रीय कर्मचारी सेना चिटणीस श्री. तातू नाईक श्री. सचिन लिमन श्री.अमर पाचागणे कोर कमिटी मेंबर्स श्री. प्रशांत सावंत, विठ्ठल पवार, अशोक सूर्यवंशी, रवींद्र जाधव मिलिंद लाडे, प्रशांत मगर, शामराव पवार असे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |