Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

मराठी भाषा बोलता न येणाऱ्या ११ रिक्षाचालकांना उपप्रादेशिक परिवहन विभाग कल्याणकडून नोटीस..

डोंबिवली ( शंकर जाधव ) : मराठी भाषा शिका अन्यथा परवाना रद्द असा स्पष्ट शब्दात इशारा देऊनही अद्याप अनेक रिक्षाचालकांनी मराठी भाषा शिकली नाही. अशा रिक्षाचालकांवर कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नोटीस बजावण्यात येत आहे.दोन दिवसात डोंबिवलीतहि कारवाई केली जाणार आहे.

शुक्रवार २१ तारखेला कल्याण येथील दुर्गाडी चौक येथे ११ रिक्षाचालकांवर नोटीस बजावण्यात आली आहे. या रिक्षाचालकांनी एका महिन्यात कल्याण येथील आरटीओ कार्यालयात येऊन प्रमाणपत्र किंवा मराठी भाषा बोलून दाखवावी असे सांगण्यात आले आहे.

परिवहन विभागाकडून मराठी भाषेतून प्रवाशीशी बोलणे बांधनकारक करण्यात आले आहे. हा नियम न पाळणाऱ्या आणि मराठीतून न बोलणाऱ्या रिक्षाचालकांवर प्रादेशिक परिवहन अधिकारी कडून कारवाईचा इशारा दिला आहे. अमराठी चालकांसाठी शासनाकडून मराठी प्रशिक्षण मोहीम राबविण्यात आली आहे. ज्याची मुदत १५ ऑगस्ट २०२६ रोजी संपली. मुदतीत मराठीचे व्यवहारिक ज्ञान व दाखविण्यास किंवा नियमांचे उल्लंघन केल्यास चालकांचे परवाना किंवा बॅच निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई केली जाईल अशा शब्दात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी इशारा दिला आहे.

 रिक्षाचालकांना शासनानकडून 'महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा पाठयक्रम यशस्वीपणे केला' असे नमूद, त्या रिक्षाचालकाचे नाव, रिक्षानंबर व आवश्यक माहिती ' असे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. कल्याण डोंबिवलीत एकूण ४२००रिक्षाचालककांनी मराठी भाषा शिकली असून त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

कल्याण येथे कारवाई नंतर आता दोन दिवसात डोंबिवलीत आरटीओ कडून कारवाई केली जाणार आहे असे आरटीओ अधिकारी रोहन जाधव यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |