Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

पै फ्रेंड्स लायब्ररी डोंबिवली आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन प्रस्तुत ‘लेखक व बालवाचक महोत्सव २०२६

डोंबिवली ( शंकर जाधव ) : पै फ्रेंड्स लायब्ररी डोंबिवली आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन प्रस्तुत ‘लेखक व बालवाचक महोत्सव २०२६’ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी “स्वरचित कथालेखन स्पर्धे” चे आयोजन करण्यात आले होते.

रविवार दि. २० सप्टेंबर २०२६ ला डोंबिवलीच्या टिळक नगर विद्या मंदिरात संपन्न झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
डोंबिवली, कल्याण, ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, वाशी, कोपरखैरणे, नेरूळ, पनवेल, डहाणू, बोरिवली, दादर व्यतिरिक्त जालना, चंद्रपूर, अमरावती, सांगली, अहिल्यानगर, नांदेड असे महाराष्ट्रभरातून १२३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला उंच भरारी घेता यावी या उद्देशाने आयोजित ही स्वरचित कथालेखन स्पर्धा इयत्ता ४ थी- ५ वी , इयत्ता. ६ वी – ७ वी आणि इयत्ता ८ वी ते १० वी अशा ३ गटांमध्ये आणि मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांमध्ये घेण्यात आली.

या स्वरचित कथालेखन स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांना त्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचे आमदार राजेश मोरे यांनी अभिनंदन केले व उत्तम लिहिण्यासाठी विविध भाषांमधील उत्तम वाचत राहा अशा शुभेच्छा ही त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.

या स्पर्धेसाठी आवश्यक असलेले लेखन साहित्य रायटिंग पॅड, पेन, पेन्सिल, पट्टी, खोडरबर व शार्पनर तसेच खाऊचा डब्बा स्पर्धा आयोजकांकडून सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात आला. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या पाल्याला प्रोत्साहन देणारे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या बसण्याची योग्य व्यवस्था व त्यांच्यासाठी नाष्ट्याची उत्तम व्यवस्थाही आयोजकांनी केली होती.

सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आमदार राजेश मोरे यांच्याबरोबर जिल्हा उपप्रमुख श्री. राजेश कदम तसेच सागर जेधे यांसह टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी श्री राजा कामतेकर तसेच श्री महेश नाईक, आणि माधव जोशी, ललिता छेडा, मीना गोडखिंडी, दिपाली काळे, सतीश चाफेकर, अनिल त्रिवेदी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

पै फ्रेंड्स लायब्ररीचे पुंडलिक पै, आणि डॉ. विंदा भुस्कुटे, लीना ओक मॅथ्यू, ज्योती दाते, अमेय घैसास यांच्या स्पर्धा संचालन समिती सह लायब्ररीचे सर्व कर्मचाऱी तसेच स्पर्धा पर्यवेक्षक म्हणून काम केलेले लायब्ररीचे हितचिंतक यांनी ही भव्य स्वरचित कथालेखन स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |