Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

गोठेघर-भंडार्ली म्हाडा वसाहतीतील पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर; आमदार राजेश मोरे यांची तातडीची बैठक

नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या; पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी म्हाडा अधिकाऱ्यांशी चर्चा

गोठेघर (प्रतिनिधी) : गोठेघर-भंडार्ली येथील म्हाडा वसाहतींमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या गंभीर प्रश्नाची दखल घेत आमदार राजेश मोरे यांनी आज नागरिक आणि संबंधित म्हाडा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत पाणीटंचाईमुळे नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

म्हाडा वसाहतींमध्ये नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजेश मोरे यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच पाणीपुरवठ्यातील अडचणी दूर करून नागरिकांना नियमित पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

पाणीटंचाईचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. नागरिकांना दिलासा मिळावा आणि पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करण्याची आवश्यकता बैठकीत अधोरेखित करण्यात आली.

या बैठकीला कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख गणेश जेपाल, १४ गावांतील शिवसेना शाखाप्रमुख निलेश पाटील, अतिष पाटील, दर्शन भोईर, उपसंघटक धनाजी पाटील, युवासेना अधिकारी संदीप पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी आणि म्हाडा वसाहतीतील नागरिक उपस्थित होते.

गोठेघर-भंडार्ली परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी झालेल्या या बैठकीमुळे नागरिकांचे लक्ष आता संबंधित प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |