Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी वर्गाला २१,००० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर

कल्याण ( शंकर जाधव ) : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिकारी वर्गास तसेच वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचारी वर्गास २१,००० रुपये सानुग्रह अनुदान यावर्षी देणार असल्याची माहिती महापालिका महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी - थविल यांनी पत्रकारांना दिली.

दीपावलीपूर्वी सानुग्रह अनुदान देण्यासाठी कर्मचारी संघटनांची बैठक घेण्यात आली . गतवर्षी महापालिका कर्मचारी वर्गास रुपये २०,०००,/- इतके सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यावर्षी त्याच्यामध्ये एक हजार रुपये वाढ करून आता २१००० रुपये इतके सानुग्रह अनुदान आता महापालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग १ ,वर्ग २ वर्ग ३ व वर्ग चार मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे यावर्षी आशा वर्करच्या अनुदानात देखील वाढ करण्यात आली असून यावर्षी आशा वर्कर यांस ६००० रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

यावेळी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी,शिवसेना पक्षाचे गटनेते विश्वनाथ राणे, भाजपाचे गटनेते शशिकांत कांबळे, काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी, महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक सुरेश बनसोडे, मुख्य लेखा अधिकारी निलेश नलावडे,महापालिका सचिव किशोर शेळके, सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे कामगार संघटनेचे नेते सचिन बासरे, चरणसिंग टाक,प्रतीक पेणकर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |