Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री महालक्ष्मी जगदंबेचे दर्शन

नागपूर, दि. १२ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी नवरात्र उत्सवानिमित्त कोराडी येथील मंदिरात जाऊन श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचे दर्शन घेतले.

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन सज्ज आहे. शेतकऱ्यांनाही या संकटाचा सामना करण्याची शक्ती मिळो, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवीकडे घातले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित भाविकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. मंदिर व्यवस्थापनातर्फे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृह राज्यमंत्री पंकज भोयर, आ. परिणय फुके, आ. डॉ. राजीव पोतदार आदी याप्रसंगी उपस्थित होते.

कोराडी येथे दरवर्षी नवरात्र उत्सव उत्साहात साजरा केला जातो. या काळात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची येथे मोठी गर्दी असते. मंदिर समितीतर्फे भाविकांना यंदाही येथे अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |