Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

खोपटा पुलाच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी; वाहतूक कोंडीतून जनतेची लवकरच सुटका होण्याची अपेक्षा !

उरण दि १० ( विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील खोपटा पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार वर्ग, वाहनचालक तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जनतेची ही गैरसोय लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने खोपटा पुलाच्या दुरुस्तीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष दादा ठाकूर, मनसेचे डॅशिंग नेतृत्व तथा उरण तालुका अध्यक्ष अ‍ॅड. सत्यवान पंढरीनाथ भगत, उरण पंचायत समिती सदस्या कविता पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण साहेब, उरण-पनवेल उपअभियंता एम. डी. पाटील , शिवसेना तालुका संघटक रुपेश पाटील, मनसे तालुका उपाध्यक्ष राकेश भोईर, तसेच शिवसेनेचे विभागप्रमुख आणि दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या पाहणीदरम्यान पुलाच्या दुरुस्तीच्या कामाचा दर्जा, काम पूर्ण होण्यास लागणारा कालावधी आणि नागरिकांची वाहतूक कोंडीतून कधी सुटका होणार, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, १० ऑक्टोबरपर्यंत पुलावरील वाहतूक पूर्णपणे सुरू करण्यात येईल, तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंच्या जोडरस्त्यांचेही डांबरीकरण करण्यात येईल असे सांगण्यात आले.

जनतेच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न लक्षात घेता, संबंधित विभागाने दिलेल्या आश्वासनाची वेळेत पूर्तता करावी आणि काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि जनहिताच्या प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एकत्रितपणे आवाज उठवत राहतील असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |