Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

पडले-भोलेनाथ नगरमधील समाजकंटकांना पोलिसांचा दणका; अंमली पदार्थ विक्रीविरोधात शिळ-डायघर पोलिसांची धडक कारवाई सुरू

वेदिका पाटील यांच्या तक्रारीची दखल; सहाय्यक आयुक्तांच्या आदेशानंतर गस्त वाढवली, पोलिस निरीक्षक मंदाकिनी चोपडे यांचे समजपत्र

शिळफाटा ( विनोद वास्कर ) : कल्याण-शिळ रोडवरील पडले गाव, भोलेनाथ नगर, ग्लोबल हिल्स सोसायटी आणि खरवली देवी परिसरात समाजकंटकांचा त्रास आणि अंमली पदार्थांची विक्री व सेवन होत असल्याची गंभीर तक्रार पडले गाव येथील प्रभाग क्रमांक २९ ब ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका वेदिका साहिल पाटील यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त, कळवा विभाग, ठाणे शहर यांच्याकडे दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी केली होती.

या तक्रारीची तात्काळ दखल घेत शिळ-डायघर पोलीस ठाण्याने कारवाईचा बडगा उगारला आहे.

शिळ-डायघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (प्रशासन) मंदाकिनी चोपडे यांनी जा.क्र. शिळ डायघर पो.स्टे./८०३९/२०२६, दि. ०२/१०/२०२६ रोजी तक्रारदार वेदिका पाटील यांना अधिकृत समजपत्र दिले आहे.

समजपत्रात काय म्हटले आहे ?
"आपला तक्रार अर्ज प्राप्त झाला असून त्यात नमूद केलेल्या भोलेनाथ नगर, ग्लोबल हिल्स आणि खरवली देवी परिसरात गणवेशातील पोलीस व तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सतर्क गस्त करण्याचे आदेशित केले आहे. त्यानुसार पोलीस पेट्रोलिंग करीत असून सदर परिसरात अंमली पदार्थ सेवन करणारे व विक्री करणारे यांच्यावर कारवाई करीत आहेत. भविष्यात देखील अशीच कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे."

तक्रारीवर कारवाई झाल्याने सदर अर्ज दप्तरी दाखल करण्यात आल्याचेही पोलिसांनी कळविले आहे.

दरम्यान, पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे भोलेनाथ नगर, पडले आणि ग्लोबल हिल्स परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून ही गस्त अशीच कायम ठेवावी, अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |