Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

ज्येष्ठ बौद्ध साहित्यिक डी. एल. कांबळे यांच्या दोन धम्मग्रंथांचा प्रकाशन सोहळा कल्याणमध्ये

 कल्याण ( आशा रणखांबे  ) : धम्मसूर्य प्रकाशन, कल्याण यांच्या वतीने ज्येष्ठ बौद्ध साहित्यिक डी. एल. कांबळे लिखित दोन महत्त्वपूर्ण धम्मग्रंथांचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात ‘तथागतांचा धम्म आणि विज्ञान’ (चौथी आवृत्ती) तसेच ‘बोधिसत्त्वाच्या जातक अट्ठकथा’ खंड ३ (दुसरी आवृत्ती) या ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी श्रमण शिक्षा अभियानाचे भंते संघपाल उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. दामोदर मोरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून विचारवंत राजाराम पाटील, पाली भाषा व इतिहासाचे अध्यापक प्रा. विजय मोहिते, नाट्यकलावंत प्रा. डॉ. अनुप्रिया खोब्रागडे आणि पाली शिक्षिका प्रा. डॉ. संघमित्रा जाधव उपस्थित राहणार असून ते प्रकाशित ग्रंथांवर आपले विचार मांडणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. युवराज मेश्राम करणार असून सूत्रसंचालन साहित्यिक नवनाथ रणखांबे करणार आहेत. तर अनिल बसवंत आभार प्रदर्शन करणार आहेत. या सोहळ्यास प्रबुद्ध भारत मेट्रो रेसिडेन्सी, कल्याण, धम्मदीप सांस्कृतिक मंडळ, कल्याण आणि प्रज्ञाबोधी साहित्य अकादमीचे सदस्य व धम्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे स्थळ : धम्मदीप बुद्धविहार, राजभर नगर, चिंचपाडा रोड, कल्याण (पूर्व).

वेळ : रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता.

धम्म, विज्ञान, बुद्धविचार आणि बौद्ध साहित्याच्या प्रसाराला चालना देणाऱ्या या ग्रंथप्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमी, धम्मबांधव आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन धम्मसूर्य प्रकाशनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |