Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

कबीरांचे दोहे म्हणजे जीवनाला दिशा देणारे अमूल्य विचार! – प्रा. दामोदर मोरे यांचे प्रतिपादन

वडोदरा  ( आशा रणखांबे  ) : "कबीरांच्या दोह्यांमध्ये 'कडवाहट ' आहे पण ती निंबाच्या पानासारखी आरोग्यवर्धक आहे.त्यामध्ये 'गरमाहट ' आहे पण विकारांच्या थंडीत कुडकुडणार्यांसाठी ती आवश्यक आहे.त्यामध्ये वीजेचा 'गडगडाहटही ' आहे , पण झोपलेल्यांना आणि झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागवण्यासाठी तो अत्यावश्यक आहे.कबीरांचे दोहे प्रबुद्ध आणि प्रज्ञावंत शिक्षकां सारखे आजही आपणास आनंदी जीवन जगण्याची कला शिकवतात." असे प्रतिपादन जेष्ठ मराठी - हिंदी साहित्यिक प्रा.दामोदर मोरे यांनी वडोदरा येथे केले.

गुजराती - हिंदी लेखक, माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ.आर.एच.वनकर यांनी लिहिलेल्या 'संत कबीर की अमूल्य वाणी ' आणि त्यांनी हिंदीतून गुजराती भाषेत अनुवादित केलेल्या माधोदास मुंदडा यांच्या 'सुखी जीवन' या पुस्तकाचे, तसेच डॉ. सुरेंद्र परमार यांनी जयप्रकाश नवेंदू यांच्या हिंदीतून इंग्रजीत केलेल्या An Angel In India याआत्मचरित्राचे ,तसेच त्यांनी हिंदीतून गुजरातीत केलेल्या माधोदास मुंदडा यांच्या रसो वै स: अशा चार पुस्तकांचे प्रकाशन करताना प्रा.दामोदर मोरे हे बोलत होते.अध्यक्षस्थानी गुजराती - हिंदी लेखक , पश्चिमांचल हिंदी प्रचार समितीचे प्रमुख डॉ.माणिक मृगेश हे होते.या वेळी बोलताना ते म्हणाले की," कबीर हे आपल्या दोह्यांमध्ये जीवनोपयोगी दृष्टांत देतात.त्यांचे दोहे आपणास वैज्ञानिक दृष्टी देतात." या प्रसंगी प्राचार्य वशिष्ठधर द्विवेदी यांचे ही भाषण झाले.

रचना कुमारी आणि डॉ सुरेंद्र कुमार यांनी प्रमुख पाहुणे प्रा.दामोदर मोरे यांना , तर अध्यक्ष माणिक मृगेश यांना डॉ.आर एच बनकर यांनी सन्मानित केले.यावेळी झालेल्या कवी संमेलनात कामना गुप्ता, डॉ लता सुमन, अरविंद मिश्र, उपेंद्र मेहता, दिलीप पटेल,एन एस परमार,दीपक गायकवाड, नारायण प्रसाद, दिनेश डोंगरे, राखी कटियार ,रेखा करनकाल, राजू पटेल यांनी आपल्या कविता सादर केल्या.डॉ.राखी कटियार यांनी कार्यक्रमाचे नेटके आणि सुंदर सूत्र संचालन केले तर वीणा सेमवाल यांनी आभार मानले.या शानदार आणि जानदार सोहळ्याची सांगता स्वादिष्ट भोजनाने झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |