Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे तरुण समाजात निर्माण होणे काळाची गरज ! ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांचे प्रतिपादन

 मुंबई (  प्रतिनिधी आशा रणखांबे )  सम्यक संकल्प सामाजिक सेवा संस्था, मुंबई (रजि.) यांच्या वतीने ७० व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त ‘सम्यक प्रज्ञा शोध परीक्षा-२०२६’ आयोजित करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथावर आधारित ही परीक्षा घेण्यात आली. या स्पर्धेत १७५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. 

या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांनी धम्माच्या प्रचार आणि प्रसाराचे महत्त्व अधोरेखित करताना, “धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे तरुण समाजात निर्माण होणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन लोअर परेल, मुंबई येथे केले. यावेळी गुणाजी काजीर्डेकर यांनी उपस्थितांना विशेष मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धार्थ पवार, दामोदर जाधव, प्रदीप पवार, अनिल कदम आणि स्नेहल जाधव उपस्थित होते.

या परीक्षेच्या आयोजनासाठी प्रमोद पवार, सचिव कांबळे, समीर जाधव, सुबोध तांबे, नितेश सावंत, सुनील मोहिते, सुरेश मोहिते आणि सचिन कदम यांनी परिश्रम घेतले. तर परीक्षा पर्यवेक्षक म्हणून बाळकृष्ण तांबे, सचिन कांबळे, लीना कांबळे, कांचन तांबे, ठकसेकुमार जाधव, हर्षल गोंडान आणि सुमेध प्रभुलकर यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वरांजली कदम होत्या. त्यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. 

स्वप्नील कदम यांनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या माध्यमातून तरुणांमध्ये धम्मविचार, प्रज्ञा आणि सामाजिक जाणीव रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |