डोंबिवली ( शंकर जाधव ) : मौजे जुनी डोंबिवली येथील जुना सर्वे नं. १०/१४ व नवीन सर्वे नं. २१/१४, जुना सर्वे नं. ७९/४ व नवीन सर्वे नं. ५९/४ तसेच जुना सर्वे नं. १०/१८ व नवीन सर्वे नं. २१/१८ या जमीन मिळकतींसंदर्भात नजराणा भरण्याबाबतच्या अर्जावर करण्यात आलेल्या पंचनाम्यांतील कथित अनियमितता, संबंधित महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी डोंबिवलीतील जोशी कुटुंबियांनी केली आहे.
नामदेव रघुनाथ जोशी व सदानंद नामदेव जोशी व कुटुंबिय हे बुधवार २८ तारखेपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आमरण उपोषणास बसले आहेत.
