ट्रम्पेट वादनातून परिसरात निर्माण केली वेगळी ओळख
दिवा : आगासन गावातील प्रसिद्ध ट्रम्पेट वादक वैकुंठ चाऊ मुंडे यांचे मंगळवार दिनांक 6 आक्टोबर रोजी अल्प आजाराने दुःखद निधन झाले. आगासन येथील समशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वैकुंठ चाऊ मुंडे हे आपल्या ट्रम्पेट वादनाच्या कलेसाठी परिसरात परिचित होते. विविध धार्मिक, सामाजिक तसेच पारंपरिक कार्यक्रमांमध्ये ट्रम्पेट वादनातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने गावातील सांस्कृतिक आणि पारंपरिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच त्यांच्या कलेवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. एक गुणी कलाकार आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याने आगासन गावात शोक व्यक्त केला जात आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी यशोदाबाई मुले योगेश , प्रतीक , भाऊ नारायण मुंडे असा परिवार आहे. त्यांचा दहावा विधी गुरुवार दिनांक 15 आक्टोबर रोजी आगासन येथिल गणेश घाट येथे तर उत्तरकार्य ( तेरावा विधी ) रविवार दिनांक 18 आक्टोबर रोजी राहत्या घरी शंकर मंदिर जवळ आगासन पोस्ट दिवा तालुका/ जिल्हा ठाणे येथे सम्पन्न होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे .
