Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

नाना इंटरप्राइजेसतर्फे आदिवासी पाड्यात दिवाळी फराळासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !

जे. एन. पाटील यांच्या पुढाकाराने रास गावातील गरजू कुटुंबांना धान्य, ताट-वाट्या, साड्यांचे वाटप; विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्याचे वितरण

मुरबाड : सामाजिक बांधिलकी जपत नाना इंटरप्राइजेसतर्फे समाजसेवक जे. एन. पाटील यांच्या पुढाकाराने दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ रोजी मुरबाडच्या पुढील आदिवासी पाड्यातील रास गावात गरजू आणि गरीब कुटुंबांसाठी दिवाळीनिमित्त मदतकार्य राबविण्यात आले.


या उपक्रमांतर्गत आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळ, धान्य, ताट-वाट्या तसेच साड्यांचे वाटप करण्यात आले. सणासुदीच्या काळात गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

याशिवाय, बेतवडे येथील समाजसेवक जे. एन. पाटील यांच्याकडे गणपती दर्शनासाठी आणण्यात आलेले शैक्षणिक साहित्यही विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा आपटे पठार आणि टिकेवाडी, सरळगाव येथील विद्यार्थ्यांना तसेच शहापूर तालुक्यातील गोकुळगाव येथील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

दिवाळीच्या आनंदात गरजू कुटुंबांना सहभागी करून घेण्याबरोबरच ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक मदतीचा संगम साधणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |