डोंबिवली ( शंकर जाधव ) : पंधरा वर्षांपूर्वी 22 मे 2010 रोजी मंगळूर एअरपोर्टवर असाच विमान अपघात झाला होता आणि या विमान दुर्घटनेत सुद्धा डोंबिवलीची एक तरुणी तेजल कामुलकर जी तुकाराम नगर येथील सौभाग्य इमारतीत आपल्या कुटुंबासह राहत होती.
पंधरा वर्ष्यापूर्वीच्या ह्या अपघातात १६६ पैकी १५८ प्रवासी मृत्युमुखी पडले होते आणि त्यात ६ विमान कर्मचारी त्यापैकी एक होती. डोंबिवलीची तेजल कामुलकर जी केबिन क्रू मेंबर म्हणून काम करत होती, तिचा मृतदेह सुद्धा २ दिवसांनी ताब्यात मिळाला होता.ते दोन दिवस तुकाराम नगर परिसरात दुःखवटा पसरला होता आणि आता 15 वर्षांनी त्याचीच पुनरावृत्ती झाली. केबीन क्रू म्हणून काम करणारी डोंबिवलीची तरुणी अश्याच विमान अपघाताचा बळी ठरली आणि डोंबिवलीवर दुःखाची छटा पसरलली.
अहमदाबाद विमान दुर्घटनेतील डोंबिवलीच्या रोशनी सोनघरे च्या दुःखद बातमीने दुर्दैवी तेजल कामुलकरची आठवण आली, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ह्या दोन्ही तरुणींनी शिक्षण घेऊन स्वतःच्या हिमतीवर पायावर उभ्या राहिल्या,.आपल्या कुटुंबियांचा आधार बनल्या आणि दैवाने मात्र संपूर्ण कुटुंबावर असा घाला घातला.