ठाणे : दिनांक ०९/०९/२०२५ रोजी गुन्हे शाखा, घटक - १, ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, “दि. ०९/०९/२०२५ रोजी १९:०० वा ते २०.०० वा च्या दरम्यान अगर त्यासुमारास एक ३० ते ३५ वर्षे वयाचा इसम पांढ-या रंगाच्या हुंदाई आय २० गाडी क्र. MP- 09-DC-2908 या गाडीतुन त्याच्या ताब्यात एम.डी. (मेफेड्रॉन) क्रिस्टल पावडर हा अंमली पदार्थ सोबत बाळगुन विक्री करीता नाशिक हायवेने मुंब्य्राकडे जाण्यासाठी जुना खारीगांव टोलनाक्याजवळून जाणार आहे. मिळालेल्या बातमी नुसार वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखा, घटक - १, ठाणेचे पोलीस पथकाने खारीगांव टोलनाका याठिकाणी सापळा लावुन इसम नामे सुरेशसिंह गंगासिंह तंवर, वय - ३५ वर्षे, रा- ग्राम किसनगड, ता. ताल, जिल्हा- रतलाम, राज्य मध्यप्रदेश यास त्याच्या हुंदाई आय २० गाडी क्र. MP- 09-DC- 2908 या मोटारकार सह ताब्यात घेतले. त्याच्या व वाहनाच्या झडतीमध्ये एकुण ७५,२२,५०० /- रू. किं.ची ५०१.५० ग्रॅम वजनाची व्यापारी मात्रा असलेली M. D. (mephedrone) क्रिस्टल पावडर हा अंमली पदार्थ मिळून आल्याने त्याच्या विरूद् कळवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं. ७४१ / २०२५ एनडीपीएस अॅक्ट १९८५ चे कलम ८(क), २२ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाच्या तपासात अटक आरोपी सुरेशसिंह तंवर याने त्याचे साथीदार नामे कुलदिपसिंह परिहार व अभिषेक जैस्वाल यांच्या सह सदरचा अंमली पदार्थ विक्री करीता ठाणे येथे आणल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पाहिजे आरोपींचा शोध घेउन त्यापैकी आरोपी नामे कुलदिपसिंह परिहार यास दि. १२/०९/२०२५ रोजी अटक करण्यात आलेली आहे. अटक आरोपी यांची दि. २०/०९/२०२५ रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजुर आहे. गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा, घटक - १, ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक विजय मोरे हे करीत आहेत.
सदर गुन्हयातील आरोपीत हे मुळचे राहणारे मध्यप्रदेश राज्यातील असून त्यांनी गुन्हयातील जप्त अंमली पदार्थ मध्यप्रदेश व राजस्थान सिमेवर असलेल्या गावातुन विक्री करीता आणल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. पाहिजे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
सदरची कामगिरी श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे ठाणे, श्री. शेखर बागडे, सहा. पोलीस आयुक्त, शोध- १, गुन्हे शाखा, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सचिन गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, घटक- १, ठाणे, विजय मोरे, सहा. पोलीस निरीक्षक, दिपक घुगे, पोलीस उप निरीक्षक, रविंद्र पाटील, पो. उपनिरीक्षक, सपोउनिरी दयानंद नाईक, सुनिल माने, पोहवा / अविनाश पाटील, प्रशांत निकुंभ, संदीप महाडिक, पोशि/ सागर सुरळकर, मयुर लोखंडे, चापोहवा / शशिकांत सावंत यांनी केलेली आहे.