कल्याण ( शंकर जाधव ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचा शुक्रवारी १९ तारखेला कल्याण व अंबरनाथ शहरात दौरा होणार आहे.
अंबरनाथ येथील पनवेलकर सभागृहात सकाळी १० वाजता पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अंबरनाथ येथे दुपारी १२ वाजता विद्यार्थी सेना कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.
दुपारी १ वाजता कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यात येणार आहे.