Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

नवरात्र उत्सव व प्रारंभ घट यांची पारंपरिक परंपरेनुसार म्हात्रे कुटुंबातील देव्हाऱ्यात स्थापना

उरण दि २४ ( विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील गोवठणे गावातील फेमस युट्युबर तथा गोवठणे गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रेम म्हात्रे यांच्या कुटुंबातील देव्हाऱ्यात घट स्थापना करण्यात आली.प्रेम म्हात्रे हे ज्या म्हात्रे कुटुंबातील देव्हाऱ्यात सदस्य आहेत त्या देव्हाऱ्यात नवरात्रोत्सव व घट स्थापना मोठ्या उत्स्फूर्त वातावरणात स्थापन झाले.सर्व मंगल मांगल्ये! शिवे सर्वार्थ साधिके!!

शरण्ये त्रंबके गौरी नारायणे नमोस्तुते!! असे जयजयकार करत जल्लोषमय वातावरणात घटस्थापना झाले.सर्व भारतात मोठ्या आनंदात आणि भक्तिमय वातावरणात घट स्थापना साजरा करण्यात आला. गोवठणे, ता- उरण येथे म्हात्रे कुटुंबियांतील कुलदैवत मंदिरामध्ये घट बसविणे, मंदिरातील देवदेवतांची, पूजा अर्चा, अभिषेक, शुद्धीकरण, नैवेद्य आणि सामूहिक आरतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात, भक्तिमध्ये, आणि आनंदाच्या वातावरणात पार पडले. म्हात्रे कुटुंबियांतील सर्व लहान थोर, जेष्ठ मंडळी, तरुण मित्र मंडळी, आणि माता भगिनी उपस्थित राहून घटस्थापनेच्या पूजा विधिला उपस्थित राहून कुलदैवत खंडोबा देवाचा कुलस्वामिनी तुळजा भवानी देवीचा आणि सर्वच देवदेवतांचा आशीर्वाद घेतला. 

नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्री उत्सवात सर्व म्हात्रे कुटुंबीय, नातेवाईक, भावबंध, आणि माता भगिनी मोठ्या उत्साहात मंदिरात उपस्थित राहून देव देवतेची सेवा करत असतात. दर दिवशी ( रात्री ) कुलदैवत मंदिरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. सर्व भक्तगण आपआपली सर्व कामे ऍडजेस्ट करून, आरती, जागरण, प्रसाद, व नैवेद्य आणून देवाला अर्पण करतात. मग ते नैवेद्य प्रसाद म्हणून ( आल्पोपहार / नाष्टा ) सर्वांना वाटप करतात. 

विशेष म्हणजे सर्वच खंडोबा भक्त, आणि दुर्गा मातेच्या उपासक माता भगिनी वेगवेगळे आर्थिक, वस्तू रूपाने, किंवा इतर मदत करून, एकमेकांना सहकार्य करतात हे विशेष.एकंदरीत सर्व म्हात्रे कुटुंबियांच्या, भावाबंध मंडळी, बच्चे कंपनी, सर्व तरुण मित्र मंडळी, माताभगिनी, आणि सर्व भक्तगण यांच्या सहकार्याने नवरात्र उत्सव अतिशय आनंदात आणि भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |