मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिव विधी व न्याय विभागाचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि कायदेशीर मदत पोहोचवण्यासाठी शिव विधी व न्याय विभाग कशाप्रकारे भक्कम पायरी ठरू शकतो, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
उद्धवसाहेबांनी आपल्या मार्गदर्शनात अधोरेखित केले की –
"न्याय ही केवळ न्यायालयीन लढाई नाही, तर तो सामान्य जनतेच्या आयुष्याशी निगडित असलेला विश्वास आहे. आज शिव विधी व न्याय विभाग हा विश्वास जपण्यासाठी खंबीरपणे उभा आहे."
या वेळी विशेषतः खासदार अनिल देसाई व आमदार अनिल परब उपस्थित राहून सर्व पदाधिकारी व वकील संघटनांना प्रेरणादायी शब्दांत मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक बळ मिळाले.
कार्यक्रमास वकील संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी न्यायासाठी लढा देण्याचा आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत कायदेशीर मदत पोहोचवण्याचा नवा संकल्प केला.
शिव विधी व न्याय विभागाचा हा तिसरा वर्धापन दिन केवळ औपचारिक कार्यक्रम न ठरता, न्याय व जनतेसाठी लढा देण्याचा नवा उत्साह, नवी जबाबदारी आणि दृढनिश्चय घेऊन साजरा झाला.