डोंबिवली ( शंकर जाधव) : द्वारकानाथ ठाकूर चौक येथे काँक्रीट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन गुरुवार 30 तारखेला पार पडले.
हा रस्ता भाजपा प्रदेशअध्यक्ष तथा डोंबिवली विधानसभा मतदार संघ आमदार रवींद्र चव्हाण l यांच्या आमदार निधीतून द्वारकानाथ ठाकूर चौक ते जुनी डोंबिवली रिक्षा स्टँड क्रमांक 1 या दरम्यान तयार होत असून, परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
उद्घाटन प्रसंगी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, स्थानिक नागरिक तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी आमदार चव्हाण यांच्या विकासदृष्टिकोनाचे कौतुक करत आभार व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून “सर्वांपर्यंत विकास, प्रत्येक प्रभागात सुविधा” हा संकल्प प्रत्यक्षात उतरताना नागरिकांना दिलासा मिळत असल्याचे भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष कृष्णा पाटील यांनी यावेळी सांगितले.
