Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

रायगडच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय लाठी स्पर्धेमध्ये सुयश.

उरण दि १९ ( विठ्ठल ममताबादे ) : दिनांक १४,१५, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी राजस्थान मधील अलवर परशुराम बाबा हॉलमध्ये राष्ट्रीय पारंपारिक लाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली. सदर या स्पर्धेसाठी साडेतीनशे विद्यार्थी विविध राज्यातून स्पर्धेत सहभागी झाले होते.

या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे.रोहित शरद घरत लाठी वार मध्ये गोल्डमेडल व पट्टा बाजी यात सिल्व्हर मेडल, नेहा रोहित घरत एक लाठी मध्ये ब्रॉन्झमेडल, गोपाळ दिनकर म्हात्रे याने एकलाठी प्रकारात सिल्व्हर मेडल, व पट्टा बाजी मध्ये सिल्व्हर मेडल प्राप्त केले. या विजयी उमेदवारांना सिहान राजूकोली यांनी मार्गदर्शन केले.ही स्पर्धा राजस्थान अलवर फेडरेशन यांनी भरविली होती.

या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र सिंग तोमर,प्रदेश प्रवक्ता भाजपा राजपाल सिह सिसोदिया,कार्यकारणी अध्यक्ष ठाकूर विश्वप्रताप सिंग चोहान,सहआयोजक विशाल सिह सोळंकी,महासचिव राहुल दुबे, फाऊंडर अरविंद जोशी,राष्ट्रीय पंचप्रमोद विश्वकर्मा, किशोर साकेत आदी मान्यवर उपस्थित होते.विजयी सर्व उमेदवारांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राष्ट्रीय रेफ्रि कमिशन मध्ये गोपाळ म्हात्रे याची सभासद म्हणून व महाराष्ट्र महासचिव राजू कोळी यांची राष्ट्रीय मॅनेजमेंट कमिटी मध्ये चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |