डोंबिवली ( शंकर जाधव) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण ग्रामीण विधानसभा सह समन्वयकपदी शिबू शेख यांची नियुक्ति करण्यात आली आहे. कल्याण ग्रामीण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी शेख यांना नियुक्तपत्र देऊन अभिनंदन केले.
नवीन नियुक्तीबाबत शेख म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा नेते आदित्य ठाकरे, जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.मी पक्षवाढीसाठी व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो असे आश्वासन देतो.
