कल्याण - डोंबिवलीच्या विकासाचे 'स्पीडबेकर' कोण? भाजपाचा शिवसेना ( शिंदे गट )ला प्रश्न
फोडाफोडीच्या राजकारणाला छेद देत विकासाकडे कल...शिवसेना ( शिंदे गट ) चे उत्तर
डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर पूल व ठाकुर्ली उड्डाणपूल हे दोन मार्ग आहे. नवीन कोपर पुलाचे लोकपूर्ण त्यावेळचे नगरविकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर ठाकुर्ली उड्डाणपुलाचे डोंबिवली विधानसभा मतदार संघांचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी केले होते.
या उड्डाणपुलाचे काम पूर्वकडील स.वा.जोशी शाळेजवळ तर पश्चिमेला बावनचाळीजवळ पुर्ण झाले. या पुलावरून वाहतूक सुरु झाली मात्र ठाकुर्लीजवळील म्हसोबा उन्नत मार्गाजवळील काम अनेक वर्ष रखडले होते. पूर्वेकडील 90 फिटपर्यत जाणाऱ्या या मार्गाचे काम कधी पुर्ण होणार याकडे कल्याण डोंबिवलीकरांचे लक्ष लागले होते.या मार्गाच्या कामासाठी एमएमआरडीएकडून ३६ कोटीचा निधी मंजूर झाला आहे.या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेने भाजपाला डीवचणारा बॅनर लावत 'फोडाफोडीच्या राजकारणाला छेद देत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विकासाकडे कल' असा आशयाचा बॅनर लावला. याला उत्तर देत भारतीय जनता पार्टीने ' कल्याण डोंबिवलीच्या विकासाचे स्पीडब्रेकर कोण' असा प्रश्न 90 फिट रोडवर बॅनर मधून उपस्थित केला.
याबाबत शिंदेंच्या शिवसेने महिला पदाधिकारी कविता गावंड म्हणाल्या,खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे महायुतीचे खासदार आल्याने भाजपानेही त्यांच्या कामाच्या कौतुकाचे बॅनर लावायला हवे होते. तर भाजपाच्या माजी नगरसेविका खुशबू चौधरी म्हणाल्या, खरं शिवसेने आम्ही काम केले असे श्रेय घेण्याचे बॅनर लावण्यात काहीही अर्थ नाही.
