कल्याण ( प्रतिनिधी ) ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांचे निर्देशानुसार ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे मोठे योगदान आहे. यामध्ये काम करणाऱ्या ग्रामपंचायती,पंचायत समिती, व जिल्हा परिषदासाठी सन२०२५'२६या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग, व राज्य अशा चार स्तरावर प्रोत्साहन देण्याकरिता'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, सुरू करण्यात आले असून यातील तालुकास्तरीय मुल्यमापन समितीच्या सदस्य पदी कल्याण तालुक्यातील जेष्ठ पत्रकार संजय जयवंत कांबळे यांची निवड करण्यात आली असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
शासनाच्या विविध योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जातात. याचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे, लोकांचे जीवनमान उंचावणे,ग्रामपंचायतीच्या लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, नागरिकांना सुलभरितीने सेवा देणे, महाराष्ट्रातील थोर संत परंपरेत सहभाग घेणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय, या मुख्य क्षेत्रामध्ये ग्रामपचायतीचा सहभाग वाढवून पंचायत राज संस्था गतिमान करणे या संकल्पनेतून 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू करण्यात आले आहे.
या मुल्यमापन समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी असून सदस्य म्हणून महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, कृषी अधिकारी, उप अभियंता(बांधकाम)उप अभियंता(पाणी पुरवठा)उप अभियंता(लघुपाटबंधारे)विस्तार अधिकारी, या समितीमध्ये असून अंत्यत महत्त्वाच्या अशा शासनाच्या या समितीवर पत्रकार संजय कांबळे यांची नियुक्ती करण्यात आल्याने ठाणे जिल्हा परिषदेचे वरीष्ठ अधिकारी, तत्कालीन गटविकास अधिकारी संजय भोये, सध्याचे गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी,तत्कालीन तहसीलदार सचिन शेजाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ आशा मुंजाळ, दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ पूनम जयकर, आरोग्य कर्मचारी,सामाजिक कार्यकर्ते किरन केणे, महेश देशमुख,संजय घारे, म्हारळ ग्रामपंचायतीच्या सरपंच निलिमा म्हात्रे,इत्यादींंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.(फोटो)
