कल्याण ( संजय कांबळे) : ठाणे जिल्ह्यात भाजपात मोठ्या प्रमाणात'प्रवेश प्रकिया, राबविण्याचा सपाटा सुरू असल्याने जिल्ह्यातील कल्याण, मुरबाड आणि शहापूर तालुक्यात येत्या झेडपी, पंचायत समिती निवडणुकीत स्वतः चे अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान'महाविकास, आघाडीसमोर असणार आहे.
भाजपाने निवडणूक प्रकियेची जबाबदारी वनमंत्री गणेश नाईक आणि माझी पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या वर सोपविली आहे, याचा परिणाम म्हणून कल्याण डोंबिवली परिसरातील मोठे नाव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दिपेश म्हात्रे काँग्रेसचे संतोष केणे यांच्या सह अनेक नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला, त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(अजित पवार)चे मोठे नेते भाजपात जाणार असल्याची माहिती मिळत आहे, शिवाय इतर पक्षातील काही माझी आमदार, मोठे पदाधिकारी हे भाजपाचा आश्रय घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
मुरबाड मध्ये भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्या विरोधात कडवे आव्हान उभे केलेले शरद पवार यांच्या पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार हेच आता भाजपवाशी होणार असल्याने येथेही विरोधक शिल्लक आहेत असे वाटत नाही. शहापूरची परिस्थिती वेगळी नाही, भिवंडीत ठाकरे गटाचे साईनाथ तारे यांच्या सह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला, त्यामुळे जिल्ह्यात केवळ भाजप व शिंदे सेना हे दोनच पक्ष आहे की काय असे वाटायला लागलं आहे.
कल्याण ग्रामीण भागात मात्र अजूनही शिवसेना(उबाठा)शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस अजून ब-यापैकी तग धरून आहे, खरेच नेते, पदाधिकारी हे स्वतः च्या स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारत असले तरी सर्वसामान्य जनता, मतदार हे आजही महाविकास आघाडीच्या विशेष करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत, आता यांना गरज आहे ती म्हणजे यांच्यात एकमत असणे, एकदिलाने काम करणे, जिथे शक्य आहे तेथे महाविकास आघाडीचा सर्वानुमते एकच उमेदवार देणे. इतर छोट्या मोठ्या पक्षाना बरोबर घेऊन मतांची विभागणी टाळणे आणि सर्वात महत्त्वाचे, सताधा-यावर नाराज असलेल्या शेतकरी, मतदार, तरुण, महिला यांच्या पर्यंत अंत्यत प्रभावीपणे पोहचणे,यातूनच महाविकास आघाडीचे अस्तित्व दिसून, येणार आहे.
