मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र राज्य लॉटरी, महाराष्ट्र शासन तर्फे ‘महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत’ १ नोव्हेंबर २०२५ रोजी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालय, वाशी, नवी मुंबई येथे पार पडली.
या सोडतीमधून “जनतेच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी” या ब्रिदवाक्याचा पुरेपूर अवलंब करण्यात आला आहे. या सोडतीतील पहिले (सामायिक) बक्षीस तिकीट क्रमांक DI-04 47495 हे ठरले असून, रु. १ कोटी चे हे बक्षीस महावीर लॉटरी सेंटर, कोल्हापूर येथील खरेदीदारास प्राप्त झाले आहे.
सोडतीत रु. १,००,०००/- ची ७ बक्षिसे, तसेच रु. १०,०००/- च्या आतील रकमेची ७,४५७ बक्षिसे लागली असून, एकूण बक्षिसांची रक्कम रु. १,४१,६८,९००/- इतकी आहे.
रु. १०,०००/- पेक्षा जास्त रकमेच्या बक्षिसांसाठी खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या अधिकृत वेबसाईटवर नमूद प्रक्रियेनुसार अर्ज कार्यालयाकडे सादर करावेत. तर रु. १०,०००/- पर्यंतच्या बक्षिसांसाठी मागणी संबंधित लॉटरी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालय, वाशी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
