रविवार दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृह मीरा रोड पूर्व येथे भव्यदिव्य स्वरूपात संपन्न होणार पुरस्कार वितरण कार्यक्रम
मुंबई ( शांताराम गुडेकर ) : जय गणेश मित्र मंडळ मुंबई , दिलीप नामे आणि सहकारी यांच्या कार्याची दखल घेत कलगी तुरा लोककला संवर्धनपर अविरत कार्यरत असणारी कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई-(महाराष्ट्र राज्य) संस्थेच्या वतीने कलगी तुरा आदर्श आयोजक पुरस्कार-२०२५ साठी निवड झाल्याचे पत्र श्री.संतोष धारशे (सरचिटणीस) कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई यांनी दिले आहे.
कोकणातील कलगी तुरा लोककला आणि शाहिरी परंपरेला प्रोत्साहन देणारी गेली ६५ वर्ष कलगी तुरा लोककला संवर्धनपर अविरत कार्यरत असणारी कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई-(महाराष्ट्र राज्य) संस्थेच्या वतीने मुंबई नगरीत प्रथमच गौरी गणेश नृत्य स्पर्धा-२०२५ आणि दिनदर्शिका -२०२६ प्रकाशन तसेच शाहीर गुणगौरव सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन रविवार दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृह,दहिसर चेक नाका जवळ, महाजन वाडी, मीरा रोड पूर्व येथे भव्यदिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे.
कलगी तुरा आदर्श आयोजक पुरस्कार-२०२५ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे कोकणसह मुंबईतील शक्ती-तुरा मंडळ, नमन मंडळ यांच्या तर्फे जय गणेश मित्र मंडळ, दिलीप नामे आणि सहकारी यांच्यावर अभिनंदन सह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
