मुंबई (शांताराम गुडेकर ) : शिवसेना नेते सचिव शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष,खासदार श्री.अनिल भाऊ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्राहक कक्षाचे सचिव अशोक शेडे,सचिव निखिल सावंत यांच्या सुचनेनुसार ईशान्य मुंबई विभाग प्रमुख सुरेशजी पाटील,शाखाप्रमुख अजय भोसले यांच्या सहकार्याने घाटकोपर पश्चिम कक्ष पदाधिकारी यांच्या मदतीनेप्रकाश भुजबळ हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे ८ एप्रिल २०२४ रोजी या कंपनीत कामाला लागले होते.
अगदी प्रामाणिकपणे काम करत असताना FABINDIA LIMITED RCT मॉल या साईटवर गेल्या १८ महिन्यापासून काम करत होते त्याचे वैयक्तिक कामांमध्ये वाद झाल्या कारणामुळे त्यांना कामावरून काढण्यात आले होते.घाटकोपर पश्चिम विधानसभा संघटन श्री.यशवंत खोपकर,वार्ड क्रमांक १२६ चे तानाजी उलालकर,उपसंघटक १२६/१६७ विकास डुकरे,उपसंघटक १२३/१२४ राजेंद्र पेडणेकर यांनी आर. सिटी मॉल येथे जाऊन मॅनेजमेंट यांच्याशी बोलणे करून प्रकाश भुजबळ यांना त्वरित जवळपास पवई FAB INDIA येथील साईटवर १६,००० हजार पगारावर कामावर ठेवून घेण्यात आले.त्याबद्दल घाटकोपर पश्चिम कक्ष पदाधिकारी व शाखा क्र १२६ पदाधिकारी गजानन भोसले मा.उपविभाग प्रमुख, अनंत माहाडकर, लक्ष्मी जांभळे, वसंत कदम, दिनेश भोगले, सत्यवान बावकर यासर्वाचे आभार पत्र देऊन प्रकाश भुजबळ यांनी आभार व्यक्त केले.
