उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी करंजा मच्छीमार सोसायटी करंजा ता.उरण, जिल्हा रायगड येथे सागरी मासेमारी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन भारत सरकार मार्फत आयोजित करण्यात आले होते.
प्रशिक्षणार्थींना माहिती देताना विभागाचे अधिकारी दिनेश राव, प्रशिक्षणार्थी सेजल कोळी, रेश्मा कोळी व निशिकेत म्हात्रे, शिबिराला चेअरमन प्रदीप नाखवा, रायगड जिल्हा मच्छीमार सेलचे अध्यक्ष सिताराम नाखवा,माजी चेअरमन के.एल कोळी, सेक्रेटरी जयंत कडू,कुंडेगाव सोसायटीचे चेअरमन रत्नाकर कोळी व इतर समाज बांधव उपस्थित होते.यावेळी विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
