सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती.
उरण दि ९(विठ्ठल ममताबादे ) : आज रायगड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावाने शासनाच्या विविध प्रकल्प साठी दिल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकरी देशोधडीला लागला आहे. मूलभूत सेवा सुविधा पासून वंचित राहिला आहे ही बाब लक्षात घेऊन वशेणी येथील सामाजिक कार्यकर्ते लवेश म्हात्रे यांनी शेतकऱ्यांनो, भूमीपुत्रांनो आपल्या पिकत्या जमिनी विकू नका. देशोधडीला लागू नका. स्वतः च स्वतःचा विकास करा असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. व्हाट्सअप वर त्यांचा हा सामाजिक संदेश मोठया प्रमाणात व्हायरल झाला आहे. भविष्यात रायगड जिल्ह्यात जमीन शिल्लक राहणार नाही किंवा शेती शिल्लक राहणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना, भूमीपुत्रांना एकत्र येऊन यावर पुढील विचार करणे गरजेचे आहे असे त्यांनी आपल्या सामाजिक संदेशात म्हंटले आहे.
व्हाट्सअप वर व्हायरल झालेला मेसेज, आवाहन :-
आज शेतकऱ्याच मानसिक संतुलन बिघडलय कारण आज ७ व्या महिन्यात सुद्धा पाऊस जाण्याच चिन्ह दिसत नाही.निसर्गाणीपन शेतकऱ्याला वेठीस पकडले आहे. परिणामी ७० टक्के लोकांनी पुढल्या वर्षी शेती न करण्याचा मनात निर्णय घेतला आहे. कारण ह्या वर्षी एकरी भातापेक्षा २० हजार रुपये जास्त खर्च झाला आहे म्हणून खचून जाऊ नका माझ्या शेतकरीराजा.आपली भुमाता परप्रांतीय(ढेरगुजरे) आपल्या उरण, पेण, पनवेल-कोकणांत अमराठी माणसं जमिनी घेऊन त्यावर गावोगावी बॅनर लावून व खोट्या रील (व्हीडिओ) ची जाहिरात करून पैसे कमवतात आणि आपल्या लोकांना फसवून वेडे बनवतात.एकरच्या एकर जमिनी ते डेव्हलप करत आहेत.त्यांना जे महत्व समजलंय ते उरण,पेण,पनवेल-कोकणकरांना नाही समजलंय.यामध्ये उरण, पेण,पनवेल -कोकणातील माणसेही आली आणि आपल्या जमिनी कोकणांत असताना मुंबई- ठाण्यात नोकरीत जीव अडकवणारे कोकणवासी सुद्धा आले.जिथपर्यंत आपल्याला उरण, पेण, पनवेल- कोकणचं महत्व समजणार नाही तोपर्यंत आपण फक्त जमिनी विकणार.एका जमिनीवर पाच सहा नावे लावून भावा भावात भांडत बसणार आणि गावी जमिनी ओसाड टाकून, कूजवून मुंबई, ठाणे, नविमुबंईत नोकरी करत बसणार.यातून कृपया बाहेर या. हें म्हणजे एखाद्याने बँकेत सोने ठेवून भीक मागण्यासारखे झाले.उरण, पेण, पनवेल-कोकण बदलत आहे. पायाभूत सुविधा कोकणांत आल्या आहेत. अनेक नवनवीन प्रोजेक्ट डेव्हलप होत आहेत. कोकणची कनेक्टीव्हिटी वाढत आहे. सिलिंक, विमानतळ चालू झाल आत्ता अलिबाग कॉरिडॉर चालू होतोय ह्यामुळे उद्या अजुन नव नवीन प्रकल्प होणार.शाळा आहेत कॉलेजेस आहेत.उद्योग आणि शेतीची अनेक क्षितिजे आहेत.आपल्याला नोकऱ्या निर्माण करायच्या आहेत. मुंबईचे प्रदूषण सोडले तर इतर सर्व काही उरण, पेण, पनवेल- कोकणांत आहे.अजुन येत आहे. आणि जे मुंबईत नाही तो आनंद निसर्ग पर्यावरण सुद्धा कोकणात आहे.तरीही ठाणे, मुंबईची साथ काही सुटत नाही. मुंबईत, ठाण्यात राहण्याची हौस काही भागत नाही.उरण, पेण, पनवेल -कोकणातील जागा म्हणजे सोने, सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. आपण लोखंडाच्या भावाने ती परप्रांतीयांना गुंठा २ ते ३ लाखने देत आहात आणि त्यातून ते परप्रांतीय (ढेरगुजरे) हिरे, मोती काढतील.मग ऐका कोकण तुमचे आणि भांडी घसा आमचे म्हणून जमिनी विकू नका आणि त्या ओसाड टाकू नका व कुजवुही नका. जमिनीवर काय काय करता येईल त्याचा अभ्यास करा.सल्ला घ्या आपल्या आगरी तज्ज्ञ शेतकऱ्यांचा. उरण, पेण, पनवेल चा कृषीविभाग काहीच मार्गदर्शन करत नाही.कृषिविभाग मृत्यू पावलाय. म्हणून आपल्या आपणच माणसांना विश्वासात घ्या. जवळच्या दहा शेतकऱ्यांना एकत्र जमवा व ग्रुप करा. आणि सामयिक शेतीत(लघुदयोग)करायला सुरुवात करुया.कुणी तुमची जमीन बळकावत नाही. सहकार क्षेत्र उरण, पेण, पनवेल -कोकणांत रुजवूया.कुठलाही राजकीय नेता तुमचे भले करणार नाही. तुमच्या जीवनाचे तुम्हीच शिल्पकार बना. आपणहून पुढे या आपल्या घामातून हिरे, मोती पिकवून वडिलोपार्जित काल्या आईला सोन्यानी मढवा.आधी उरण, पेण, पनवेल -कोकण वाचवा. गावी या आपल्या जमिनी आपल्या ताब्यात घ्या. सात बारा नीट करा. आर्थिक कुवतीचा अंदाज घ्या. प्रोजेक्ट कुठला राबवायचा ते ठरवा. आवश्यक ते नुसार प्रशिक्षण घ्या मच्छी,कुकुट, गाय म्हैस, शेळी, बटेर, पालन करा.एखादा गट करून सर्व मिळून वेअरहाऊस(गोडाऊन), सागरी, भुजल मच्छीमार सोसायटी करा. खादी ग्रामोद्योग, कृषी विद्यापीठ, पुण्याचे मिटकॉन ग्रुप तुम्हांला लागेल ते प्रशिक्षण देऊ शकतात. फुकट मिळण्याची अपेक्षा करु नका. तुम्ही व्यवसाय करणार आहात आणि तो दीर्घकालीन आहे तर त्यासाठी गुंतवणूक करावी लागेल. त्यांच्या कडून एक चांगला प्रोजेक्ट करून घ्या. बँकेत जा. मेनेजरला भेटा. एकदा भेटून ऐकणार नाही. पाच सहा वेळा जा. पहा सगळे तुम्हांला मदत करायला तयार होतील.पुणे विद्यापीठाला भेटी द्या. तुमच्या जमिनीत कित्ती प्रकारच्या गोष्टी करता येतात हें बघून तुम्हांलाच हसू येईल असे वाटेल कि, इतके दिवस काय झक मारली होती. पर्यटनाला तर अंतच नाही. गोवा मान झुकवेल एकदा पुर्ण पोटेंशीअलने उरण, पेण, पनवेल-कोकण पर्यटन सुरु झाले की !! कितीतरी तांदळाच्या प्रजाती आहेत.भाज्या आहेत रानभाज्या टाकला, डावला, कोवला, कुडूस, कंटोला, हळद्या, देटी, टेरा, शेवला, दुगीपाला,अंबाडी, शेवगी, शेगटाच्या शेंगा,पाल्याची पावडर(moringa) आहे.कोकणची फळे आहेत.आंबा नारळ आहेत.कोकम आहे.सुपारी आहे.मसाल्याची पिके आहेत.औषधी वनस्पतींचे कितीतरी प्रकार कोकणला पोषक आहेत. सुगंधी वनस्पतींचे प्रकार आहेत.बांबू आहे.साग आहे शिसव आहे.अगदी चंदन सुद्धा होऊ शकते कोकणांत.!!! अजुन काय पाहिजे ? कोकणची माती शुद्ध आहे. रसायनांचा भडिमार नाही.सेंद्रीय जोडीला मधुमक्षिका पालन करा.मोकळ्या जमिनीत खेकडा, मत्स्यशेती करा.पुणे गोवा मुंबई तीन मार्केटस हात जोडून उभे आहेत. इकडे एक्स्पोर्ट साठी उभा समुद्र आहे.किती किती करता येण्यासारखे आहे.फक्त तुम्ही ठरवा.आणि पहिले पाऊल पुढे टाका.उरण, पेण, पनवेल -कोकणच्या ग्रामदेवता आणि कुलदेवता पुर्ण शक्तीनिशी तुमच्या मागे उभ्या राहतील.मी स्वतः माझ्या टेरेस गार्डनवर माझ्या घराला लागणारी भाजी केमिकल खतचे वापर न करता बनवितो. टेरेसवर जिताड्यांच्या पिल्लांची पैदास करतो. तसेच खुंटी, गुट्टी, इयर्स, भेट कलम ह्या सर्व प्रकारे आंब्यांचे१५० झाडे स्वतः बनवून लावली आहेत.सांगण्याचं तात्पर्य एवढेच की सोन्यासारखी जमीन सोन्याच्या भावाने विका.२ किंवा ३ लाखाला गुंठा विकू नका.पनवेल मधील मोठा खांदा येथील काही शेतकरी न्यायालयात गेल्यामुळे न्याया लयाने त्यांना १ गुंठयाला ५८ लाख रू भाव देण्याचा आदेश सरकारला दिला आहे म्हणून त्याही पेक्षा त्या शेतकऱ्यांना जास्त भाव मिळायला हवा हिच अपेक्षा आहे असे मत सोशल मीडिया वर लवेश दामोदर म्हात्रे वशेणी, तालुका उरण, जिल्हा रायगड यांनी व्यक्त केले आहे.विविध विषय संदर्भात नेहमी लवेश म्हात्रे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करीत असतात.
