डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीतील आन्वी शैलेश सुवर्णा या 10 वर्ष हिने एक संकल्प केला होता की माझ्या वाढदिवशी मी अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया 17 किलोमीटर सागरी जलतरण अंतर पोहून पार करणार.
तो संकल्प आन्वीने 21 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे 2 वाजून 27 मिनिटांनी अंगाला ग्रीस लावून समुद्राची पूजा करून अटल सेतू येथून अरबी समुद्रात चंद्राच्या चांदण्याच्या उजेडात सूर मारून महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक श्री. सुनील मयेकर यांच्या देखरेखेखाली पोहणे चालूच ठेवले. अंगाला थंडी लागत होती.पोहत असताना समुद्रात कुठे थंड पाणी कुठे गरम पाणी लागत होते.छोटे छोटे मासे चावत होते.समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे आन्वी ला थोडा त्रास झाला. भरती ओहोटी, समुद्रात मोठमोठ्या बोटी,शिप, ये -जा करीत होत्या.त्यांच्यामुळे लाटा उसळत होत्या.गेट वे ऑफ इंडिया जवळ पाण्यावर तेलाचा तवंग होता.ते पाणी तोंडांत जायचे उलटी सारखे होत होते.समुद्रात प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला लागत होते. रात्रीचा अंधार असल्यामुळे दूरचे काही दिसत नव्हते. आन्वी ने जिद्द ,चिकाटी,मेहनत याच्या जोरावर एक ही विश्रांती न घेता सलग पोहत राहिली.सकाळी 5 वाजून 11 मिनिटांनी आन्वी गेटवे ऑफ इंडिया ला पोहचली.तिने अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया 17 किलोमीटर सागरी जलतरण अंतर 2 तास 44 मिनिटात पोहून पार केले.
गेटवे ऑफ इंडिया ला पोहचल्यावर प्रशिक्षक विलास माने रवी नवले,संतोष पाटील, आईवडील, नातेवाईक यांनी आन्वी चे जोरदार स्वागत केले.
यश जिमखाना मध्ये आन्वीला आई वडील पोहणे शिकण्यासाठी घेऊन आले. ती 8 दिवसातच पोहायला शिकली.ती शिकत असताना इतर मुलांची प्रॅक्टीस बघायची.इतर मुले स्पर्धेत जातात.समुद्रात जातात सर मला पण जायचं आहे अस ती बोलायची.मग आन्वी च्या आई वडिलांशी बोलून तीला अँडव्हान्स कोचिंग सुरू केले.एक महिना झाल्यावर तिला उरण येथील संतोष पाटील यांच्याकडे 4 वेळा समुद्रात प्रॅक्टीस ला नेले.तिथे तिने चांगली प्रॅक्टीस केली. प्रशिक्षक विलास माने व रवी नवले यांच्याकडून आन्वी पोहण्याचे धडे गिरवत आहे.
आन्वी ने मालवण,गोवा येथील समुद्रात स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे.यश जिमखाना मालक राजू वडनेरकर, व्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्यांनी आन्वीचे अभिनंद करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.आता आन्वीचे पुढील लक्ष धरमतर अलिबाग ते गेट वे ऑफ इंडिया असं आहे.
