Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी ‘मेकिंग द डिफरन्स’ एनजीओ व पीपीएफएएस म्युच्युअल फंडचा संयुक्त पुढाकार

‘संजीवनी’ प्रकल्पांतर्गत दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण; प्रत्येकी ७० पेक्षा अधिक वैद्यकीय उपकरणांची मदत

ठाणे – ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सुलभ व प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मेकिंग द डिफरन्स एनजीओ व पीपीएफएएस म्युच्युअल फंड यांच्या सीएसआर (CSR) सहकार्यांतर्गत ‘संजीवनी’ प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रास ७० हून अधिक अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे व आरोग्य साहित्य प्रदान करण्यात आले असून, या सुविधांमुळे संबंधित केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या दररोज १०० हून अधिक रुग्णांना थेट लाभ मिळणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

या उन्नतीकरण व साहित्य हस्तांतरण कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा दि. २ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना रणजित यादव म्हणाले, “‘ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेली प्राथमिक आरोग्य केंद्रे अधिक सक्षम होत आहेत, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. भविष्यातही अशाच सहकार्याची अपेक्षा आहे.”
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले की,“मेकिंग द डिफरन्स एनजीओच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण करण्यात आले आहे. पीपीएफएएस म्युच्युअल फंड व एमटीडी यांच्या सहकार्यामुळे मिळालेली आधुनिक वैद्यकीय उपकरणे आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. भविष्यातही अशा उपक्रमांसाठी आम्ही उत्सुक आहोत.”

पीपीएफएएस म्युच्युअल फंडचे चीफ मार्केटिंग ऑफिसर व हेड – कम्युनिकेशन शैलेन्द्र पांडेय यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,“गेल्या तीन वर्षांपासून आम्ही मेकिंग द डिफरन्स एनजीओसोबत कार्यरत आहोत. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ आर्थिक मदत न देता, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या प्रत्यक्ष गरजा ओळखून त्यानुसार आवश्यक उपकरणे पुरवली जातात. या उपक्रमांचा लाभ वंचित व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचतो, याचे समाधान आहे.”

पीपीएफएएस म्युच्युअल फंडचे ॲप डेव्हलपमेंट मॅनेजर लुनार सुतार यांनी सांगितले की, “सीएसआर अंतर्गत दिलेली ही मदत समाजाप्रती असलेल्या आमच्या सामाजिक जबाबदारीचे प्रतीक आहे. आमचे प्रयत्न समुदायासाठी उपयुक्त ठरत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे.”

मेकिंग द डिफरन्स एनजीओच्या उपाध्यक्ष द्विती मेहता यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “पीपीएफएएस म्युच्युअल फंड, जिल्हा परिषद प्रशासन तसेच या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या सहकार्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये आरोग्य सेवा अधिक सक्षम करता येत आहे.”

प्राथमिक आरोग्य केंद्रात दिलेल्या विविध उपयोगी वस्तुची किमंत ५० लाख असून लॅपरोस्कोप, आयसीयु बेड, स्ट्रेचर, बेबी वॉर्मर, टेबल, खुर्ची, मेडीसीन ट्रॉली, डीप फ्रिजर, फ्रिज, टिव्ही, कपाट, ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेशन, ऑक्सीजन सिलेंडर, ऑपरेशन इंस्ट्रूमेंट, फंक्शन बेड अशा वस्तू प्राथमिक आरोग्य केंद्रास दिल्या आहेत.

या कार्यक्रमास गट विकास अधिकारी लता गायकवाड, पीपीएफएएस म्युच्युअल फंडच्या प्रिया हरियाणी (चीफ कॉम्प्लायन्स ऑफिसर व कंपनी सेक्रेटरी), शैलेन्द्र पांडेय, संजना जाधव (हेड – एचआर), लुनार सुतार, राज मेहता (एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट व फंड मॅनेजर), मेकिंग द डिफरन्स एनजीओचे अध्यक्ष दिपक विश्वकर्मा, उपाध्यक्ष द्विती मेहता, डॉ. श्रीधर बनसोडे (टीएचओ) तसेच संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |