Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

समाज जीवनाचे वास्तव देणारे ज्येष्ठ साहित्यिक ए.डी.पाटील... साहित्य रत्न एल.बी.पाटील यांचे प्रतिपादन

उरण दि २३ ( विठ्ठल ममताबादे ) :  उरण येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन येथे "भावलेली व्यक्तिमत्वे" आणि "सारडे गावचे भवताल " या ए.डी.पाटील यांच्या दोन पुस्तकांच्या प्रकाशना प्रसंगी साहित्यरत्न रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील आपल्या ए.डी.सर यांच्या संबंधी बोलताना म्हणाले की, ए.डींनी ३० वर्षांच्या लेखन काळात १८ साहित्यकृती केल्या असून त्या मध्ये शेतकरी,गाव,महिला, समाज जीवन या विषयांवर लेखन केले आहे.त्यामुळे ए.डी.पाटील व एक समाज जीवनाचे वास्तव देणारे साहित्यिक आहेत,असे मत असल्याचे साहित्यरत्न, रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील यांनी मांडले.

अध्यक्ष प्राचार्य सुरेश पाटील यांचे हस्ते पुस्तक प्रकाशन झाले.पुस्तक परीक्षण स्मिता वाजेकर यांनी केले.प्रास्ताविक करतांना जीवन गावंड यांनी ए.डी.पाटील यांच्या साहित्यसेवा आणि सामाजिक सेवा यावर छान भाष्य केले . कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन रंजना केणी यांनी केले.

दहा गाव माजी विद्यार्थी संघ यांनी आपले सहकारी ए.डी.पाटील यांच्या सहयोगाचे साहित्य लेखनाचे कौतुक केले.प्रफुल्ल.वेदक,के एस पाटील, गोपाळ पाटील, सुधाकर पाटील, काशिनाथ मढवी, प्रकाश पाटील,अनंता गावंड,लवेंद मोकल चंद्रकांत मढवी , मुख्याध्यापिका ए.ए.पाटील इत्यादी मान्यवरांनी आपले विचार मांडले.पी पी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |