ठाणे - शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य शिक्षक - शिक्षकेत्तर सेनेची ठाणे जिल्हा कार्यकरणीची घोषणा नुकतीच करण्यात आली.
शिक्षक - शिक्षकेत्तर सेनेचे राज्य कार्याध्यक्ष आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते व राज्य कार्याध्यक्ष दिलीप डुंबरे, राज्य सरचिटणीस शिवाजी शेंडगे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब भवन, मुंबई येथे या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
ज्येष्ठ शिवसैनिक व एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक सुनील फापाळे यांची ठाणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच ऍडव्होकेट अनिकेत फापाळे यांची राज्य कायदेशीर सल्लागार पदी तसेच बाबाची फापाळे यांची ठाणे - पालघर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. याशिवाय कार्याध्यक्ष जगन्नाथ जाधव, चिटणीस सचिन घोडे, उपाध्यक्ष राजेंद्र निकम व आफाक सलाउद्दीन शेख, कोषाध्यक्ष रवींद्र पाटील व इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी सुनील फापाळे म्हणाले की, गेली अनेक वर्ष शिक्षकांच्या न्याय हक्क व मागण्यांसाठी लढा देऊन अनेक शिक्षकांचे प्रश्न सोडवले आहेत. यापुढेही एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक - शिक्षकेत्तर सेनेची वाटचाल ही अधिक जोमात आणि जोरात असेल. व यापुढेही सर्व शिक्षक बंधू भगिनींचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू.

