Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

पिसवली गावातील शांत, सरळ व्यक्तिमत्व ज्ञानदेव उर्फ पिंट्या मनोहर भोईर यांचे दुःखद निधन

कल्याण : कल्याण नजीक असणाऱ्या पिसवली गावातील शांत, सरळ व्यक्तिमत्व ज्ञानदेव उर्फ पिंट्या मनोहर भोईर यांचे दिनांक 14 मे 2026 रोजी वयाच्या ४३ व्या वर्षी अल्प आजाराने दुःखद निधन झाले.

पिसावली येथील समशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा प्रमाणात ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते.

ज्ञानदेव उर्फ पिंट्या मनोहर भोईर हे शांत व मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्व होते . सर्वांशी आपुलकीने वागणारे अशी त्यांची ख्याती होती.

यांच्या पश्चात पत्नी श्रद्धा पिंट्या मनोहर भोईर, 1 मुलगा , 2 मुली, आई , बहीण, भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांचा निधनाने भोईर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांचा दशक्रिया (दहावा ) शनिवार दिनांक 23 मे २०२६ रोजी श्रीक्षेत्र सिद्धेश्वर मंदिर पाचवा मैल कांबा येथे तर तेरावा विधी (उत्तरकार्य ) मंगळवार दिनांक २६ मे 2026 रोजी पिसवली, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथील राहत्या घरी होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |