डोंबिवली ( शंकर जाधव ) मे महिन्यात कल्याण डोंबिवली शहरात चोरीच्या घटनेत वाढ होत असताना दिसत आहे.७ आणि ८ या दोन दिवसात चार घरात चोरट्याने चोरी करून घरातील मुद्देमाल चोरी केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण मधील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 तारखेला सकाळी 8 ते दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास नक्षत्र अपार्टमेंटच्या पाठीमागील भगवान कृष्णा चाळीत राहणारे दयानंद कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादित त्यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्याने घरातील ग्रील व पत्र्याच्या दरवाज्याला लावलेला कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील बेडरूममधील लोखंडी कपाट व त्यातील तिजोरी तोडून त्याती सोन्याचे, चांदीचे दागिने व रोख रक्कम असे 86 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून पसार झाला. या प्रकरणी सपोनि एस. एस. भालेराव पुढील तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेत कल्याण मधील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबाग लेन नंबर 4 आशु अपार्टमेंटमधील फिर्यादी अरविंद पै यांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे पै यांच्या घरी ७तारखेला सकाळी 9 ते रात्री 9 वाजण्याच्या सुमारास बंद घरात चोरटा शिरला. त्याने घरातील लोखडी कपाट उघडून त्यातील लॉकरमधील सोन्याचे व चांदीचे व कपाटात अडकून ठेवलेल्या बँगमधील 15 हजार रुपये रोख रक्कम असे ऐकून 8,32,000 रुपये चोरी केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधव पुढील तपास करत आहेत.
तिसऱ्या घटनेत 8 तारखेला दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादी रमेश साळवी यांच्या राहत्या घरी कर्वे रोड वरील वाटवेवाडी मधील भास्कर निवास येथे घरात कोणीही नसताना घराच्या दरवाज्याचे कडीकोयडा तोडून घरात प्रवेश करत रोख रक्कम व सोन्याचे व चांदीचे दागिने चोरले. या प्रकरणी स.पो.नी कावळे पुढील तपास करत आहेत.
चौथ्या घटनेत कल्याण मधील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादी बेबी इकबाल शेख यांच्या नेतीवली येथील आनंदनगर मधील हसन अजगरी चाळीत अज्ञात चोरट्याने 8 तारखेला दुपारी साडे तीन वाजन्याच्या सुमारास घरात प्रवेश करून घरातील लॉक न केलेल्या लोखंडी कपाटाच्या तिजोरीत व ड्रॉवर मधील ठेवलेलीरोख रक्कम 17,000 रुपये चोरले. याप्रकरणी पोलीस हवालदार आव्हाड पुढील तपास करत आहेत.

