Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

बेतवडेतील भूमिपुत्रांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी शनिवारी आंदोलनस्थळी बैठक

मॅराथॉन कंपनीविरोधातील बेमुदत धरणे आंदोलनाला पाठिंबा

भूमिपुत्रांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

दिवा  : बेतवडे गावातील भूमिपुत्रांची गेल्या दहा वर्षांपासून फसवणूक झाल्याचा आरोप करत मॅराथॉन कंपनीविरोधात सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला अधिक बळ देण्यासाठी शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आंदोलनस्थळी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

भूमिपुत्रांना न्याय मिळावा आणि संबंधित बिल्डरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी व भूमिपुत्रांनी १० जुलै २०२६ पासून बेतवडे येथील मॅराथॉन कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

या पार्श्वभूमीवर अन्यायग्रस्त भूमिपुत्रांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी परिसरातील सर्व भूमिपुत्र बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या बैठकीचे निमंत्रक म्हणून काळू कोमास्कर (खंबाळपाडा), मधुकर माळी (भोपर), जे. एन. पाटील (बेतवडे), पद्माकर पाटील (घारीवली), राम म्हात्रे (देसाई), उदय मुंडे (आगासन), शशिकांत पाटील (डायघर), हनुमान पाटील (पडले), बळिराम म्हात्रे (गोळवली) आणि राजेश काळण (आजदे) हे कार्यरत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |