Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांना मातृशोक; शांताबाई बागल यांचे वृद्धापकाळाने निधन

पंढरपूर | प्रतिनिधी : गादेगाव (ता. पंढरपूर) येथील कै. शांताबाई पांडुरंग बागल (वय 85) यांचे रविवार, दि. 5 जुलै रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने गादेगावसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.


कै. शांताबाई बागल यांच्या पश्चात दोन मुले, मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुंबई उपनगरचे उपजिल्हाधिकारी सतीश बागल तसेच बाबासाहेब बागल यांच्या त्या मातोश्री होत.

गादेगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यांच्या निधनामुळे गादेगाव व परिसरात शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

कै. शांताबाई बागल यांचा तिसरा विधी मंगळवार, दि. 7 जुलै रोजी सकाळी 7.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |